
अनेकजण बिझनेस मिंटिंग, ऑफिसचे काम, फिरण्यासाठी, मधुचंद्र साजरा करण्यासाठी बाहेरगावी जाताच हॉटेल्स बुक करतात. सर्व सोईसुविधांनी युक्त असलेल्या हॉटेल्समध्ये राहणं प्रत्येकालाच आवडतं.

पण याच हॉटेलमध्ये गेल्यानंतर अनेकदा गंभीर आणि धक्कादायक घटना घडतात. हॉटेलमध्ये काही ठिकाणी गुप्त कॅमेरे लावल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. या गुप्त कॅमेऱ्यांच्या मदतीने नवरा-बायको, किंवा अन्य लोकांचे खासगी क्षण कैद करण्याचे प्रकार घडतात.

त्यामुळे हॉटेलमध्ये प्रवेश करताच कुठे छुपे कॅमेरे तर नाहीत ना, हे तपासणे गरजेचे आहे. पण छुप्या कॅमेऱ्यांसोबतच आणखी एका बाबीची काळजी घेणे फार गरजेचे आहे. कारण या एका गोष्टीची काळजी न घेतल्यास तुमच्या आयुष्यातील खासगी क्षण सर्वांसमोर येऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला आयुष्यभर पश्चात्तापाची वेळ येऊ शकते.

हॉटेलमध्ये पोहोचताच दरवाजा बंद केल्यानंतर सर्वांत अगोदर तुम्ही रुमचे पडदे लावले पाहिजेत. नाहीतर तुमचे आसगी क्षण बाहेरच्यांना दिसू शकतात.

पडदा बंद न केल्यामुळे बाहेरच्या लोकांनी हॉटेलमधील प्रसंग रेकॉर्ड केल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे हॉटेलमध्ये पोहोचताच अगोदर हॉटेलमधील पडदे बंद केले पाहिजेत.