PM Narendra Modi : दिल्लीत कॉरिडॉरची पाहणी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक खाली वाकले अन तिथला कचरा उचला… नेमकं काय झालं वाचा फोटो स्टोरीतून

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनीही पंतप्रधान मोदींचा कचरा उचलतानाचा हा व्हिडिओ ट्विट केला आहे. ITPO बोगद्याच्या उद्घाटनावेळीही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कचरा उचलून पुन्हा एकदा स्वच्छताराखण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे.

प्राजक्ता ढेकळे | Updated on: Jun 19, 2022 | 2:32 PM
1 / 7
पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांनी आज (रविवारी) ITPO बोगद्याच्या अंतर्गत प्रगती मैदान येथे मुख्य बोगदा आणि एकात्मिक ट्रान्झिट कॉरिडॉर प्रकल्पाच्या पाच अंडरपासचे उद्घाटन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवारी) ITPO बोगद्याच्या अंतर्गत प्रगती मैदान येथे मुख्य बोगदा आणि एकात्मिक ट्रान्झिट कॉरिडॉर प्रकल्पाच्या पाच अंडरपासचे उद्घाटन केले.

2 / 7

या उद्घटनाच्या कार्यक्रमानंतर पंतप्रधान स्व-बोगद्याची पाहणी करण्‍यासाठी गेले. बोगद्याची पाहणी करत असताना त्‍यांची नजर रस्‍त्‍याच्‍या काडेला असल्‍या गुटखाच्‍या छोट्या तुकड्यावर पडली. त्यांनी ते पाहून लागेचतो कचऱ्याचा तुकडा उचलला

3 / 7

पंतप्रधान पुढे आल्यानंतर त्यांना तिथे एक रकमी बाटलीही सापडली, ती रिकामी बॉटल उचलून त्यांनी ती डस्टबिनमध्ये फेकली.

4 / 7

बोगद्याचे उद्घाटन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज दिल्लीला केंद्र सरकारकडून आधुनिक पायाभूत सुविधांची अतिशय सुंदर भेट मिळाली आहे. इतक्या कमी वेळात इंटिग्रेटेड ट्रान्झिट कॉरिडॉर तयार करणे सोपे नव्हते. हा कॉरिडॉर ज्या रस्त्यांच्या आजूबाजूला बांधला आहे तो दिल्लीतील सर्वात व्यस्त रस्त्यांपै

5 / 7

मध्य दिल्लीतील ITPO बोगद्याच्या पाहणीदरम्यान पीएम मोदी रस्त्यावर पडलेला कचरा उचलतात आणि पारंपारिक कलांच्या भित्तीचित्रासमोर डस्टबिनमध्ये टाकतात.

6 / 7

गेलूया 8 वर्षांत दिल्ली-एनसीआरमधील मेट्रो सेवेची रेंज 193 किमीवरून 400 किमीपर्यंत पोहोचली आहे. याबरोबरच त्यांनी दिल्लीतील जनतेला 10 टक्के प्रवास मेट्रोने करण्याचे आवाहनही मोदींनी केले आहे.

7 / 7

या कॉरिडॉरमधील भिंत्तीवर आकर्षक असंगी भित्तीचित्रेही रेखाटण्यात आली आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us