
Hotel Secrets: एखाद्या हॉटेलमध्ये खाण्याची आणि राहण्याची एक वेगळीच मजा असते. हॉटेलमध्ये अशा अनेक गोष्टी असतात ज्या सहसा घरी नसतात. त्यामुळेच हॉटेलमध्ये राहिल्याने एक वेगळा अनुभव मिळतो.

तुम्ही हॉटेल्सच्या खास वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेतले असेल, पण तुम्हाला माहित आहे का की हॉटेल्समध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्यांना कधीच हात लावू नये ? त्या गोष्टी कोणत्या आणि असं करण्यामागचं कारण काय ते जाणून घेऊया.

हॉटेलचा मेन्यू घाणेरडा आहे का ?: तुम्ही वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये अनेक प्रकारचे मेन्यू कार्ड पाहिले असतील. हॉटेलचे मेन्यू कार्ड कधी स्वच्छ दिसतं तर कधी घाणेरडं. त्यावर अनेक जंतू असतात. खरंतर दिवसभर बरेच लोक हॉटेलमध्ये येतात आणि त्याला स्पर्श करतात. त्यामुळेच हॉटेलमधील मेन्यू कार्डला स्पर्श केल्यानंतर लगेच हात स्वच्छ धुवावेत.

हॉटेलचा फोन वापरावा का ? : हॉटेलच्या खोलीत ठेवलेला फोन नीट पाहिलात तर तुम्हाला लगेत कळेल की तो क्वचितच स्वच्छ केला जातो. म्हणूनच हॉटेलच्या फोनला स्पर्श करणे टाळावे. जर तुम्ही फोन हातात घेतलाचतच तर लागलीच पाण्याने हात स्वच्छ धुवावेत.

हॉटेलच्या दाराचे रहस्य : हॉटेलमध्ये प्रवेश करताना दाराच्या हँडलला स्पर्श करणे टाळा. खरं तर, हॉटेलमध्ये दररोज बरेच लोक येत असतात. त्यामुळे हॉटेलचं दार स्वच्छ दिसत असलं तरी तसं नसतं. त्यामुळे चुकून-माकून हॉटेलच्या खोलीच्या दाराला स्पर्श केलातच तर हात धुवायला विसरून नका.

रिमोटला हातही लावू नका : तसेच हॉटेलमधील रिमोटसारख्या गोष्टींनाही हात लावणे टाळावे. हॉटेलच्या खोल्यांमधील टीव्ही रिमोट स्वच्छ केलेले नसतात. त्यामुळे त्यामध्ये भरपूर जंतू असतात.म्हणूनच रिमोटला वगैरे चुकूनही हात लावू नका.