
भारतात कोट्यवधी मद्यप्रेमी आहेत. जगात तर ही संख्या आणखी जास्त आहे. मद्यप्रेमींना वेगवेगळी मद्यं प्यायला आवडते. एखाद्याला व्होडका आवडतो तर कोणाला रम, बिअर प्यायला आवडते. परंतु या सर्वच मद्य प्रकारांमध्ये सर्वाधिक नैसर्गिक पद्धतीने तयार करण्यात येत असलेले पेय तुम्हाला माहिती आहे का?

अनेकदा रम, व्हिस्की आणि व्होडका यांच्यातील यापैकी कोणते मद्य सर्वाधिक नैसर्गिक पद्धतीचा वापर करून तयार केलेले आहे, असे विचारले जाते. याच प्रश्नाचे उत्तर आता समोर आले आहे. मद्य तयार करताना ते कमीत कमी प्रोसेस्ड केलेले असावे, असे मद्यप्रेमींचे मत असते.

रम तयार करताना उसाच्या रसाचा वापर केला जातो. त्याआधी उस चांगल्या पद्धतीने आंबवला जातो. उसातील नैसर्गिक साखर विरघळून त्याचे अल्कोहोलमध्ये रुपांतर होण्याची वाट पाहिलीजाते. त्यानंतर डिस्टिल करून एजिंगची प्रक्रिया पार पाडली जाते. त्यामुळेच रमचा वास, रंग इतर मद्यांपेक्षा वेगळा असतो.

व्हिस्की तयार करताना गहू, मक्का यासारख्या धान्यांचा वापर केला जातो. धान्य मॉल्ट करून ते गरम पाण्यात टाकले जाते. त्यानंतर ते आंबवले जाते. पुढे डिस्टिलेशन करून व्हिस्की तयार केली जाते. त्यामुळेच व्हिस्कीला सुगंध येतो. वेगळा रंगही येतो.

मद्यांमध्ये व्होडका सर्वाधिक क्लीन ड्रिंक मानले जाते. परंतु व्होडका हे सर्वाधिक नैसर्गिक आहे किंवा नाही, याबाबत वेगवेगळी मतं व्यक्त केली जातात. बटाटा किंवा धान्य यापासून व्होडका तयार केला जातो. व्होडका तयार करताना अनेकवेळा डिस्टिलेशन केले जाते.

(टीप- या स्टोरीमधून फक्त माहिती देणे एवढाच उद्देश आहे. मद्यप्राशन आरोग्यास हानिकारक असते. मद्यप्राशन करू नये.)