महाराष्ट्रात प्रथमच बिबट्याचे दुर्मिळ पांढरे पिल्लू, वन विभागाने लावले कॅमेरा ट्रॅप

रत्नागिरी जिल्ह्यात बिबट्याचे दुर्मिळ पांढरे पिल्लू आढळून आले. एकाच ठिकाणी दोन पिल्ले आढळली आहे. त्यात एक पांढरा असून दुसरा नियमित रंगाचा आहे. वन विभागाने या पिल्लांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी परिसरात कॅमेरा ट्रॅप लावले आहेत.

| Updated on: Apr 25, 2025 | 1:53 PM
1 / 5
बिबट्याचे पिल्लू 'ल्युकिस्टिक' आहे की 'अल्बिनो' म्हणजे त्वचेचे रंगद्रव्य (मेलेनिन) कमी होण्याचा प्रकाराचा अद्याप उलगडा झालेला नाही. कारण या पिल्लाचे डोळे अजूनही उघडलेले नाही. मात्र, महाराष्ट्रात प्रथमच बिबट्याचे पांढऱ्या रंगाचे पिल्लू आढळून आले आहे.

2 / 5
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे गावात काजू लागवडीसाठी झाडे तोडण्याचे काम सुरू होते. सकाळी झाडे तोडण्याच्या कामाला सुरुवात केल्यानंतर मजुरांना बिबट्याची दोन पिल्ले दिसली. त्यातील एक पिल्लू नियमित रंगाचे तर दुसरे पिल्लू पूर्णपणे पांढऱ्या रंगाचे होते.

3 / 5
बिबट्याच्या पिल्लांचे डोळे देखील उघडलेले नव्हते. मजुरांनी लागलीच या पिल्लांची छायाचित्र टिपली. मात्र, त्याचवेळी जवळपास असणाऱ्या त्या पिल्लाच्या मादीने त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यामुळे घाबरलेली मंडळी तिथून दूर पळाली.

4 / 5
बिबट्यांच्या पिल्ल्याची माहिती मजुरांनी रत्नागिरी वन विभागाला उशिराने कळवली. त्यानंतर वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली. परंतु तोपर्यंत बिबट्याच्या त्या मादीने पिल्लांना दुसऱ्या ठिकाणी हलवले होते.

5 / 5
बिबट्याच्या पिल्ल्यास हा पांढरा रंग जेनेटिक म्युटेशनमुळे होतात. गुणसूत्रांमधील झालेले हे बदल बिबट्याची वागणूक किंवा त्याची कार्य करण्याची क्षमता देखील बदलू शकते. यामुळे वन्यजीवांच्या नेहमीच्या रंगापेक्षा वेगळा रंगही येतो.