
अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांची भारत भेट दोन्ही देशांमधील व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा आणि राजनैतिक संबंध मजबूत करण्यासाठी महत्वाची आहे. या दोन दिवशी भेटीत अनेक महत्त्वाच्या करारांवर चर्चा होणार आहे.

अल-थानी हे जगातील सर्वात श्रीमंतांपैकी एक आहे. त्यांची संपत्ती एखाद्या धनकुबेरपेक्षा कमी नाही, त्यांच्याकडे 100 खोल्यांचा सोन्याचा महल आहे. 500 वाहनांसाठी पार्किंग आहे. 3000 कोटी रुपयांची नौका आहे. एक फुटबॉल क्लब आणि स्वतःची खाजगी विमान कंपनी आहे.

शेख तमीम यांचा जन्म 1980 मध्ये कतारच्या राजघराण्यात झाला. त्यांचे वडील शेख हमद बिन खलिफा अल थानी हे कतारचे माजी शासक होते. 2003 मध्ये त्याच्या मोठ्या भावाने राजघराण्याची सत्ता सांभाळण्यास नकार दिला. त्यानंतर शेख तमीम यांना वारस म्हणून घोषित करण्यात आले.

2013 मध्ये त्याच्या वडिलांनी सत्ता सोडली. त्यानंतर शेख तमीम कतारचे अमीर बनले. त्यांचे शिक्षण लंडनमधील प्रतिष्ठित हॅरो स्कूलमध्ये झाले. त्यानंतर रॉयल मिलिटरी अकादमी सँडहर्स्ट येथे लष्करी प्रशिक्षण घेतले. 1998 मध्ये पदवी घेतल्यानंतर ते कतारला परतले आणि सैन्यात सेकंड लेफ्टनंट म्हणून रुजू झाले.

फोर्ब्सनुसार, शेख तमीम जगातील आठव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची वैयक्तीक संपत्ती अंदाजे 2.4 अब्ज डॉलर म्हणजे 20,000 कोटी रुपये इतकी आहे. अल थानी कुटुंबाची एकूण संपत्ती अंदाजे $335 अब्ज म्हणजे 28 लाख कोटी रुपये आहे. ज्यामुळे ते जगातील सर्वात श्रीमंत राजघराण्यांमध्ये होते.

शेख तमीम आणि त्याचे कुटुंब दोहा येथील आलिशान रॉयल राजवाड्यामध्ये राहतात. हा राजवाडा सोन्याने सजवलेले आहे. या विशाल इस्टेटमध्ये 15 पॅलेस आणि 500 हून अधिक कारसाठी पार्किंगची सुविधा आहे. 2019 त्यांनी ओमानमध्ये आणखी एक भव्य राजवाडा बांधला. तो दोहाच्या रॉयल पॅलेस सारखाच आहे.