
गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या राजकीय नेते मंडळींचे हात बघून भविष्य सांगणाऱ्या कॅप्टन अशोक खरात यांच्याच हातात बेड्या घालण्यात आल्या आहेत. 35 वर्षीय महिलेच्या आरोपावरून खरात यांना बलात्कार आणि जादूटोणा कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे. आता अनेकांना प्रश्न पडला आहे की अशोक खरात नेमके कोण आहेत? चला जाणून घेऊया..

अशोक खरातचा दावा आहे की, ते मर्चंट नेव्हीचे निवृत्त अधिकारी आहेत. २२ वर्षे सेवेत असताना त्यांनी अनेक देशांची सफर केली आहे.

अशोक खरात यांनी निवृत्तीनंतर ब्रह्मांडाच्या उत्पत्ती आणि रचनेचा अभ्यास केल्याचा दावा केला. तसेच ज्योतिष क्षेत्रात सुवर्ण पदक जिंकल्याचे सांगितले. ते स्वतःला ज्योतिष आणि अंकशास्त्राचे तज्ज्ञ म्हणवत होते.

अशोक खरात 'शिवनिका ट्रस्ट'चे प्रमुख आहेत आणि ईशानेश्वर मंदिराचे व्यवस्थापनही पाहत होते. अनेक सेलिब्रिटींपासून ते राजकीय मंडळींपर्यंत अनेकजण त्यांच्यासमोर माथा टेकवायचे. पण एका महिलेने केलेल्या आरोपामुळे ते चर्चेत आले आहेत.

अशोक खरात यांच्यावर 35 वर्षीय महिलेने 'नोव्हेंबर 2022 ते डिसेंम्बर 2025 या काळात मंत्र तंत्र व धार्मिक विधीच्या नावाखाली मनात विश्वास निर्माण करत फायदा घेतल्याचे म्हटले.