बिग बॉस मराठी आदेश देत आहेत… बिग बॉसचा करारी आवाज कोणाचा? पडद्यामागील गुपित उलगडले

बिग बॉस मराठीचा भारदस्त आवाज नेमका कोणाचा? २४ तास अलर्ट राहावं लागणाऱ्या त्यांच्या कामाबद्दल आणि संघर्षाबद्दल जाणून घ्या सविस्तर.

| Updated on: Feb 05, 2026 | 4:44 PM
1 / 10
छोट्या पडद्यावरील सर्वाधिक चर्चेत जाणारा आणि तितकाच वादग्रस्त शो म्हणजे बिग बॉस मराठी. या शोमधील स्पर्धकांइतकीच त्यातील एका भारदस्त आणि करारी आवाजाची चर्चा असते.

छोट्या पडद्यावरील सर्वाधिक चर्चेत जाणारा आणि तितकाच वादग्रस्त शो म्हणजे बिग बॉस मराठी. या शोमधील स्पर्धकांइतकीच त्यातील एका भारदस्त आणि करारी आवाजाची चर्चा असते.

2 / 10

"बिग बॉस मराठी आदेश देत आहेत की..." हा संवाद कानावर पडला की घरातील वातावरण एका क्षणात गंभीर होतं. गेल्या अनेक पर्वांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या आवाजामागचा चेहरा नेमका कोण आहे, असा प्रश्न चाहत्यांना नेहमीच पडतो.

3 / 10

आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. प्रसिद्ध व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट रत्नाकर तारदळकर हे या आवाजामागचा खरा चेहरा असल्याची माहिती समोर आली आहे.

4 / 10

प्रसिद्ध व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट रत्नाकर तारदळकर यांनी काही वर्षांपूर्वी एका वृत्तवाहिनीला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत रत्नाकर तारदळकर यांनी बिग बॉसच्या पडद्यामागच्या जगातील संघर्षावर भाष्य केले.

5 / 10

लोकांना वाटतं हे फक्त काही तासांचं काम आहे, पण प्रत्यक्षात मला २४ तास अलर्ट राहावं लागतं. सकाळी १० वाजता स्पर्धकांना टास्क देण्यापासून माझ्या दिवसाची सुरुवात होते. जोपर्यंत टास्क पूर्ण होत नाही, तोपर्यंत मला आपली जागा सोडता येत नाही." असे रत्नाकर तारदळकर म्हणाले.

6 / 10

बिग बॉसच्या घरात भांडण कधी होईल याची शाश्वती नसते. अनेकदा मध्यरात्री २ किंवा ३ वाजता स्पर्धकांमध्ये राडा झाला की रत्नाकर यांना तातडीने सेटवर येऊन बिग बॉसच्या भूमिकेत त्यांना शांत करावे लागते, असेही रत्नाकर तारदळकर यांनी म्हटले.

7 / 10

त्यामुळे मी एक प्रकारे मनाने कायम त्या घरातच वास्तव्यास असतो. बिग बॉसचा आवाज केवळ हुकुमी असून चालत नाही, तर त्यात एक प्रकारचा आश्वासकपणा असावा लागतो, असेही रत्नाकर यांनी सांगितले.

8 / 10

हा आवाज असा आहे जो स्पर्धकांना शिस्तही लावतो आणि गरज पडल्यास त्यांच्याशी भावनिक संवादही साधतो. या आवाजासाठी त्यांची रीतसर ऑडिशन घेण्यात आली होती, असेही रत्नाकर तारदळकर यांनी म्हटले.

9 / 10

मीच बिग बॉसचा आवाज आहे हे लपवणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. अनेकदा सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर लोक माझा आवाज ऐकून म्हणायचे की हा आवाज ओळखीचा वाटतोय. पण शोच्या गोपनीयतेमुळे मला ते मान्य करता येत नाही, असाही खुलासा रत्नाकर तारदळकर यांनी केला.

10 / 10

सर्व फोटो - बिग बॉस मराठी/ इन्स्टाग्राम

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us