जगभरात चर्चेत असणारा भारतीय कॅप्टन स्मित माछर आहे तरी कोण? थेट फ्लाइट हायजॅक करण्यापासून वाचवले

भारतीय पायलट स्मित माछर यांनी फ्लाईदुबईच्या फ्लाइटमध्ये ओमानच्या को-पायलटला प्लेन क्रॅश करण्यापासून रोखले आणि १८० प्रवाशांचे प्राण वाचवले. मात्र या घटनेत तो चाकू लागून गंभीर जखमी झाला आहे.

| Updated on: Oct 01, 2026 | 7:21 AM
1 / 5
दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लाईदुबईच्या एका फ्लाइटमध्ये बुधवारी विमानाचे पायलट आणि को-पायलट यांच्यात हिंसक झटापट झाल्यानंतर मोठा अपघात होता होता वाचला. सुमारे १८० लोकांना घेऊन जाणाऱ्या फ्लाइट FZ1073 ला आपत्कालीन संकेत पाठवल्यानंतर सौदी अरेबियाकडे वळवावे लागले आणि नंतर फ्लाइटचे भारतीय कॅप्टन यांनी सौदी अरेबियात विमानाची इमर्जन्सी लँडिंग केली. या घटनेनंतर सर्वत्र त्या भारतीय कॅप्टनची चर्चा सुरू झाली आहे, ज्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता १८० प्रवाशांचे प्राण वाचवले.

2 / 5

या भारतीय कॅप्टनची ओळख स्मित माछर म्हणून झाली आहे. स्मित माछर २०२२ मध्ये फ्लाईदुबईमध्ये थेट कॅप्टन पदावर रुजू झाले होते. त्यापूर्वी ते स्पाइसजेटचे पायलट होते, जिथे ते ११ वर्षांहून अधिक काळ काम करत होते.

3 / 5

स्पाइसजेटसोबत त्यांनी सीनियर कमांडर आणि नंतर लाइन ट्रेनिंग कॅप्टन म्हणून काम केले होते. त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, त्यांच्याकडे १३ वर्षांहून अधिक व्यावसायिक उड्डाणाचा अनुभव आहे.

4 / 5

स्मित माछर बोईंग ७३७ विमानांवर सुमारे ९,७५० उड्डाण तास पूर्ण केले आहेत, ज्यात पायलट-इन-कमांड म्हणून ६,४०० तासांपेक्षा जास्त तास समाविष्ट आहेत.

5 / 5

स्मित माछर हे मुळचे गुजरातचे आहेत. ते कामानिमित्त परदेशात वास्तव्याला आहेत. त्यांचे संपूर्ण कुटुंब देखील त्यांच्यासोबत राहत असल्याचे म्हटले जात आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us