
भोपाळमधील मॉडल खुशबू अहिरवारचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. त्यामुळे सगळ्या शहरात एकच खळबळ उडाली. खुशबू छोट्या-छोट्या ब्रांडससाठी मॉडलिंग करायची. सोशल मीडियावर डायमंड गर्ल म्हणून ओळखली जायची. नेहमी आपल्या आईसोबत मोठ्या स्वप्नांबद्दल बोलायची. याच प्रवासात तिची ओळख उज्जैनच्या कासिम बरोबर झाली. त्याच्या प्रेमात ती पडली. दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहायचे.

खुशबू मूळची मध्य प्रदेशच्या विदिशा जिल्ह्यात रहायची. तिच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. म्हणून तिने भोपाळला येऊन पार्ट टाइम काम सुरु केलं. शिक्षणाबरोबर ती मॉडलिंगही करायची. हळूहळू तिला छोट्या ब्रांड्सकडून काम मिळू लागलं. खुशबू तिच्या आईला सांगायची की, एकदिवस मी काहीतरी मोठ करेन. तिची स्वप्न मोठी होती. मेहनती मुलगी होती.

कामाच्या निमित्ताने खुशबूची ओळख उज्जैनच्या कासिम बरोबर झाली. दोघांमध्ये मैत्री झाली. हळूहळू मैत्री प्रेमात बदलली. खुशबूने तिच्या आईला सांगितलं की, ती कासिम सोबत राहते.तो एक चांगला माणूस आहे. कासिमच्या कुटुंबियांनी सुद्धा खुशबूला स्वीकारलेलं. दोघे उज्जैन फिरायला गेलेले. दोघे काही दिवस एकत्र होते. नंतर भोपाळला परतण्याची योजना बनवली.

खुशबूची आई लक्ष्मी अहिरवारने सांगितलं की,ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयरला खुशबूने शिक्षण सोडून दिलं. कामावर तिने लक्ष दिलं. कासिमवर तिचा विश्वास होता. भोपाळमध्ये त्याच्यासोबत रहायची. सोशल मीडियावर ती स्वत:च नाव खुशी वर्मा सांगायची.

उज्जैनवरुन परतताना खुशबूची तब्येत अचानक बिघडली. इंदूर येथील भैंसाखेड़ीच्या हॉस्पिटलमध्ये खुशबूला सोडून कासिम तिथून पळून गेला. तिथे तिचा मृत्यू झाला. कुटुंबीय तिथे पोहोचले, तेव्हा त्यांना तिच्या शरीरावर जखमा दिसल्या. खुशबू गर्भवती होती. दोघांची पहिली भेट लॉजवर झालेली.