Nagarjuna First Wife: वडिलांनी मुलगी शोधली, लग्न केलं पण संसार फार काळ टिकला नाही… नागर्जुनची पहिली पत्नी कोण?
Nagarjuna First Wife: दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते नागार्गुन अक्कीेनी हे कायमच चर्चेत असतात. पण तुम्हाला माहिती आहे का नागार्जुन यांची दोन लग्न झाली आहेत. पहिल्या पत्नीसोबत त्यांचा संस्कार फार काळ टिकला नाही. त्यांची पहिली पत्नी कोण होती? जाणून घ्या...

नागार्जुन अक्किनेनी हे केवळ दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक मोठे सुपरस्टार नाहीत, तर एक यशस्वी निर्माता आणि प्रेक्षकांच्या मनात खोलवर रुजलेले व्यक्तिमत्त्व आहे. आज जगभरात त्यांचे लाखो चाहते आहेत. अभिनयासोबतच नागार्जुन हे स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखले जातात. अनेकदा या सर्व गोष्टी वगळता नागार्जुन हे खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. चला जाणून घेऊया त्यांच्या खासगी आयुष्याविषयी...
नागार्जुन यांची दोन लग्न झाली आहेत. नागार्जुन यांचे पहिले लग्न घरातल्यांच्या इच्छेनुसार झाले होते. १९८४ साली त्यांनी लक्ष्मी डग्गुबती यांच्याशी विवाह केला होता. नागार्जुनचे वडील अक्किनेनी नागेश्वर राव आणि लक्ष्मीचे वडील प्रसिद्ध निर्माता डग्गुबती रामानायडू हे जवळचे मित्र होते. दोन्ही कुटुंबांनी आपल्या मुलामुलींचे लग्न लावण्याचा निर्णय घेतला होता.
त्या वेळी नागार्जुन अभिनेता म्हणून प्रसिद्ध नव्हते. लग्नानंतर दोन वर्षांनी, १९८६ मध्ये त्यांना पहिला मुलगा झाला. मुलाचे नाव त्यांनी नागा चैतन्य ठेवले. मात्र काही वर्षांतच दोघांमध्ये मतभेद वाढले आणि सततच्या भांडणामुळे १९९० साली त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
याच काळात नागार्जुन अभिनेत्री अमाला यांच्यासोबत अनेक चित्रपटांत काम करत होते. ऐशीच्या दशकात दोघांनी एकत्र अनेक चित्रपट केले आणि हळूहळू त्यांच्यात प्रेम फुलले. १९९२ मध्ये नागार्जुन आणि अमाला यांनी विवाह केला. दोन वर्षांनंतर, १९९४ मध्ये त्यांना दुसरा मुलगा झाला. मुलाचे नाव अखिल अक्किनेनी ठेवण्यात आले.
आज नागार्जुन हे दोन्ही मुलांचे प्रेमळ वडील आहेत. नागा चैतन्य आणि अखिल दोघेही चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. नागार्जुन यांचे वैयक्तिक आयुष्य अनेक चढउतारांनी भरलेले असले तरी त्यांनी आपल्या कारकिर्दीत सातत्याने यश मिळवले आहे. त्यांच्या या प्रवासाने चाहत्यांनाही प्रेरणा मिळते.