सतेज पाटलांची मोठी घोषणा, सरकारचे टेन्शन वाढले, गोकुळच्या मुद्द्यावर कोल्हापूरात..
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा वाद काही थांबण्याचे नाव घेत नाही. त्यातच सरकारने मोठी खेळी केली. सरकारच्या या खेळीनंतर सतेज पाटलांनीही मोठी घोषणा केली. हा कोल्हापूरकरांचा अपमान असल्याचे मोठे विधान सतेज पाटील यांनी केले.

गोकुळ संघावर राज्य सरकारने 5 संचालक नेमले आहेत. गोकुळच्या निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा धक्का बसला. एका जागेने महायुतीला या निवडणुकीत धक्का बसला. एकट्या सतेज पाटील सर्वांवर भारी पडले होते. त्यातच सरकारने गोकुळवर मोठी खेळी केली. गोकुळ संघ ताब्यात घेण्याचा हा सरकारचा डाव असल्याचा आरोप सतेज पाटीलांनी केला. विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांवर मंत्री हसन मुश्रीफ यांनी जोरदार टीका केली. हेच नाही तर गोकुळच्या मुद्द्यावर राहुल गांधी यांनी भाष्य केले. इतकेच नव्हे तर या 5 स्वीकृत सदस्यांना सहकारी संस्थांवर मतदानाच्या अधिकारही देण्यात आला आहे. गोकुळमध्ये सतेज पाटील यांच्या गटाला बहुमत मिळाले. त्यांना 13 जागा मिळाल्या होत्या. पण आता सरकारने बाहेरून 5 सदस्य नियुक्त करून संपूर्ण चित्रच बदलून टाकले.
त्यातच आता सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर गंभीर आरोप केले. सतेज पाटील यांनी म्हटले की, कोल्हापूरकरांचा काैल नाकारण्याचे काम सरकार करत आहे. शेतकऱ्यांचे बहुमत सरकारने नाकारले आहे. शेतकऱ्यांच्या मॅन्डेटही सरकार नाकारत आहे. सत्ता मिळवण्यासाठीच कॅबिनेटमध्ये कायदा बनवण्यात आला. ज्यांना जनतेने नाकारले ते तज्ज्ञ कसे? असा मोठा सवाल सतेज पाटील यांच्याकडून उपस्थित करण्यात आला. हा डेडलॉक नाही तर हा लोकशाही डेडलॉक करण्याचा प्रयत्न आहे.
तांत्रिक मुद्दा करून सरकारने आमचे बहुमत नाकारले. आता दोस्तीत गद्दारी झालेली आहे. बहुमत मिळाले तर तुम्ही का नाकारता? असा सवालही सतेज पाटील यांनी उपस्थित केला. संचालक नेमके होते, हायकोर्टाने ते नाकारले. माझ्या म्हणण्याचा उद्देश आहे की, कोर्टात निर्णय होईल आणि आमचा कोर्टावर पूर्ण विश्वास आहे. तुम्हाला जनतेने नाकारलं. मग आम्ही कोर्टात गेलो तर तुम्हाला कोर्टाने नाकारलं. तुम्ही शेवटी सरकारकडून हा निर्णय केला. इकडे जनतेने तुम्हाला नाकारले. कोर्टात दिलासा मिळणार नाही म्हणून सरकारने आदेश काढली.
कोल्हापूरकरांचा अपमान सरकारने केला आहे. हा स्वाभिमानी कोल्हापूरच्या जनतेचा अपमान आहे. कोल्हापूरकरांचा हा अपमान असून आम्हाला वाईट वाटतंय. आम्ही याविरोधात रस्त्यावर उतरणार आहोत. 9 तारखेला सकाळी दहा वाजता दसरा चाैक येथून कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा हा एक मोर्चा आम्ही काढणार आहोत. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत. न्यायालयीन लढाईही आम्ही करूच पण हा मोर्चाही काढणार आहोत. माझी कोल्हापूकरकरांना विनंती आहे की, हा अपमान कोल्हापूरकांचा आहे.
