
'घायल', 'दामिनी', 'गदर' आणि 'बॉर्डर' यांसारख्या चित्रपटांमधून सनी देओलने बॉलिवूड इंडस्ट्रीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करणारा सनी पाजी आजसुद्धा प्रभावशाली सेलिब्रिटींपैकी एक मानला जातो.

आश्चर्याची बाब म्हणजे इतका मोठा आणि दमदार असा करिअरचा प्रवास असूनही सनी देओल हा 'बॉर्डर 2'च्या कास्टमधील सर्वांत श्रीमंत अभिनेता नाही. सनी देओलची एकूण संपत्ती जवळपास 130 कोटी रुपयांच्या घरात आहे. संपत्तीच्या बाबतीत 'बॉर्डर 2'मधील दुसऱ्या अभिनेत्याने सनीला मागे टाकलं आहे.

'बॉर्डर 2'च्या कास्टपैकी वरुण धवन सर्वांत श्रीमंत आहे. 2012 मध्ये त्याने 'स्टुडंट ऑफ द इअर' या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. फार कमी वेळात त्याने इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी अशी छाप सोडली. संपत्तीच्या बाबतीत वरुण धवनने अनेक कलाकारांना मागे टाकलं आहे.

वरुण धवनच्या कमाईतील एक मोठा भाग चित्रपटांशिवाय जाहिरातींमधून येतो. रिपोर्ट्सनुसार, त्याची एकूण संपत्ती जवळपास 381 कोटी रुपये इतकी आहे. वरुण धवन हा प्रसिद्ध निर्माते डेव्हिड धवन यांचा मुलगा आहे.

'बॉर्डर 2'मधील इतर स्टारकास्टबद्दल बोलायचं झाल्यास, दिलजीत दोसांझ यात दुसऱ्या क्रमांकावर येतो. दिलजीतची एकूण संपत्ती ही 172 कोटी रुपयांहून अधिक आहे. दिलजीलला पंजाबी चित्रपटसृष्टीतील सर्वांत यशस्वी आणि श्रीमंत कलाकार मानलं जातं. गाणी, जगभरातील लाइव्ह कॉन्सर्ट, जाहिराती यांमधून तो भरभक्कम कमाई करतो.