
शाहरुख खानच्या बॉडीगार्डच नाव रवी सिंह आहे.तो मागच्या 10 वर्षांपासून शाहरुख सोबत आहे. फक्त शाहरुखच नाही, त्याच्या संपूर्ण कुटुंबासाठी रवी नेहमी तयार असतो. अनेक प्रसंगात रवी शाहरुख सोबत दिसतो. या दरम्यान रवी पत्नीसोबतच्या करवा चौथच्या फोटोंमुळे चर्चेत आहे.

रवीने आपल्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे करवा चौथचे फोटो शेअर केले. या फोटोसोबत त्याने प्रेम भावना व्यक्त करणारं एक कॅप्शनही लिहिलं.

रवीने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, भक्ती आणि एकजुटतेने भरलेल्या या खास दिवसासाठी हार्दिक शुभेच्छा. ईश्वर आमच्या वैवाहिक जीवनाला शक्ती आणि सद्भाव प्रदान करो.

रवीच्या पत्नीबद्दल जास्त माहिती नाहीय.पण रवीच्या सोशल मीडियावर पत्नीसोबतचे अनेक फोटो पाहता येतील.

रवीला तीन मुले आहेत. सोशल मिडिया पोस्टनुसार, रवीच्या तिन्ही मुलांना स्पोर्टसमध्ये रुची आहे. रवीने त्यांचे फोटो सुद्धा शेअर केलेत.