Tukaram Mundhe Brother : तुकाराम मुंढे यांचे भाऊ कोण आहेत? वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान!
या कारवाईमुळेच ते सगळीकडे चर्चेत आहेत. दरम्यान, तुकाराम मुंढे यांचे सध्या कौतुक केले जातेय. त्यांच्या ते एक कर्तव्यकठोर अधिकारी आहेत. परंतु आयएएस अधिकारी होण्याआधी त्यांच्या वाट्याला आलेला संघर्षही मोठा आहे.

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे हे फक्त महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात प्रसिद्ध आहेत. नियमांचे काटेकोर पालन करणारा, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. अन्न व औषद प्रशासन विभागाचे आयुक्त झाल्यानंतर त्यांनी भेसळयुक्त खाद्यपदार्थांवर कारवाई सुरू केली आहे.

या कारवाईमुळेच ते सगळीकडे चर्चेत आहेत. दरम्यान, तुकाराम मुंढे यांचे सध्या कौतुक केले जातेय. त्यांच्या ते एक कर्तव्यकठोर अधिकारी आहेत. परंतु आयएएस अधिकारी होण्याआधी त्यांच्या वाट्याला आलेला संघर्षही मोठा आहे.

ते आज आयएएस अधिकारी आहेत. परंतु हे यश मिळवण्यासाठी मोठे बंधू अशोक मुंढे यांचे त्यांना मार्गदर्शन मिळालेले आहे. भावाचे मार्गदर्शन आणि पाठिंबा याच्या मदतीने तुकाराम मुंढे आज आयएएस अधिकारी म्हणून सर्वपरिचित आहेत.

अशोक मुंढे हेदेखील एक प्रशासकीय अधिकारी राहिलेले आहेत. ते डेप्युटी कलेक्टर होते. आपल्या कार्यकाळात त्यांनीही प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडले.

आता अशोक मुंढे हे निवृत्त झाले आहेत. निवृत्तीनंतर अशोक मुंढे हे समाजकार्यात सक्रीय आहेत. अशोक मुंढे माध्यमांमध्ये फारसे चर्चेत नसतात. परंतु चर्चेत न येता ते समाजकार्यात आपला सहभाग नोंदवतात.