
अभिनेत्री शेफाली हिची संपत्ती कोणाला मिळणार अशी चर्चा सुरु आहे. रिपोर्टनुसार, शेफाली हिच्याकडे 8 - 9 कोटी रुपयांची संपत्ती होती.

शेफाली दोन वेळा लग्न बंधनात अडकली. 2004 मध्ये अभिनेत्रीने हरमित सिंग याच्यासोबत लग्न केलं. 2014 मध्ये शेफालीने अभिनेता पराग त्यागी याच्यासोबत लग्न केलं.

तिच्या आकस्मिक मृत्यूमुळे, बँक बॅलन्स आणि मालमत्तेचा कायदेशीर वारस ठरवण्याचं काम न्यायालयाचं असेल, ज्यामध्ये तिचा पती पराग त्यागी हे मुख्य दावेदार असू शकतो.

पहिल्या लग्नापासून शेफाली हिला मुल नव्हतं. शिवाय लग्नानंतर देखील पूर्व पतीसोबत कोणतेच संबंध नव्हते. त्यामुळे पहिल्या पतीचा अभिनेत्रीच्या संपत्तीवर कोणताच अधिकार नाही.

नियमानुसार, पत्नीच्या मृत्यूनंतर, तिच्या मालमत्तेचे वारस म्हणजे तिचा पती, मुले आणि पालक. जर वारस नसेल तर मालमत्ता पतीच्या वारसांना किंवा पालकांना दिली जाईल.

जर मालमत्ता वडिलांकडून किंवा आईकडून वारशाने मिळाली असेल, तर ती मालमत्ता पुन्हा वडिलांच्या किंवा आईच्या वारसांकडे परत येईल.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीचं निधन हृदय विकाराच्या झटक्यामुळे झालं आहे. पण अद्याप अभिनेत्रीचे शवविच्छेदनाचे रिपोर्ट समोर आलेले नाहीत.