पुरुषांपेक्षा महिलांना दारूची नशा लवकर का चढते? फक्त तीन गोष्टी…

पुरुषांच्या तुलनेत महिलांना दारूची नशा लवकर का चढते? यामागे केवळ सवय नसून वैज्ञानिक कारणे दडलेली आहेत. सविस्तर जाणून घ्या.

| Updated on: Jan 15, 2026 | 5:56 PM
1 / 8
अनेकदा पार्टी असो किंवा मित्र-मैत्रिणींचे गेट-टुगेदर पुरुषांच्या तुलनेत महिलांना दारुची नशा लवकर चढते, असे म्हटले जाते. काही लोक याला दारु पचवण्याची ताकदीसोबत जोडतात. पण विज्ञानानुसार, हे केवळ मनाचे खेळ नसून त्यामागे शरीराची एक खास रचना काम करत असते.

2 / 8
विज्ञानानुसार, पुरुषांच्या शरीरात पाण्याचे प्रमाण महिलांच्या तुलनेत जास्त असते. दारू शरीरात गेल्यावर ती रक्तात आणि पाण्यात विरघळते. पुरुषांच्या शरीरात जास्त पाणी असल्याने दारू त्यात मिसळते आणि सौम्य किंवा फिक्की पडते.

3 / 8
याउलट, महिलांच्या शरीरात पाण्याचे प्रमाण कमी असते. त्यामुळे त्यांनी घेतलेली दारू त्यांच्या शरीरात जास्त स्ट्राँग (Concentrated) राहते. याच कारणामुळे महिलांच्या रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण वेगाने वाढते.

4 / 8
आपल्या पोटात काही नैसर्गिक घटक असतात जे आपण खाल्लेल्या किंवा प्यायलेल्या गोष्टींना पचवण्यास मदत करतात. दारू पचवण्यासाठी शरीरात अल्कोहोल डिहायड्रोजनेज (ADH) नावाचे एक एन्झाईम लागते.

5 / 8
संशोधनानुसार, पुरुषांच्या शरीरात काही घटक खूप जास्त आणि सक्रिय असतात. त्यामुळे पुरुष जेव्हा दारू पितात, तेव्हा ती रक्तात पोहोचण्याआधीच पोटातील हे घटक तिला बऱ्याच प्रमाणात नष्ट करतात.

6 / 8
पण महिलांच्या शरीरात हे एन्झाईम्स कमी असतात. परिणामी, दारू न पचताच थेट रक्तात पोहोचते. त्यामुळे लवकर नशा चढते. पुरुषांच्या शरीरात स्नायू (Muscles) जास्त असतात, तर महिलांच्या शरीरात नैसर्गिकरीत्या चरबीचे (Fat) प्रमाण जास्त असते. स्नायूमध्ये पाणी जास्त असते, जे दारू शोषून घेण्यास मदत करते. मात्र चरबी दारू शोषून घेऊ शकत नाही.

7 / 8
जेव्हा महिला मद्यपान करतात, तेव्हा त्यांच्या शरीरातील चरबी दारू शोषत नाही, त्यामुळे ती सर्व दारू थेट रक्तप्रवाहात आणि पर्यायाने मेंदूपर्यंत पोहोचते. यामुळेच महिलांच्या मेंदूवर आणि मज्जासंस्थेवर दारूचा परिणाम पुरुषांपेक्षा खूप लवकर आणि जास्त काळ राहतो.

8 / 8
थोडक्यात सांगायचे तर, महिलांची शरीररचना ही पुरुषांपेक्षा वेगळी असते. कमी पाणी, कमी पाचक घटक (Enzymes) आणि जास्त चरबी या तीन गोष्टींमुळे महिलांना मद्याचा परिणाम लवकर जाणवतो. म्हणूनच महिलांसाठी मद्यपान हे आरोग्याच्या दृष्टीने पुरुषांपेक्षा अधिक घातक ठरू शकते.