रागाच्या भरात शरीर का थरथर कापू लागतं? ‘हे’ नॉर्मल लक्षण की अजून काय?
वाद किंवा भांडण सुरू झाल्यावर अनेकदा हात-पाय थरथर कापू लागतात. मात्र, याचा अर्थ व्यक्ती घाबरली आहे किंवा कमकुवत आहे असा होत नाही. यामागे शरीराची नैसर्गिक संरक्षण यंत्रणा आणि हार्मोन्समधील बदल कारणीभूत असतात.

- जेव्हा एखाद्या व्यक्तीशी तीव्र वाद होतो, तेव्हा मेंदूला परिस्थिती धोकादायक वाटू शकते. अशावेळी शरीर स्वतःचं संरक्षण करण्यासाठी लढा किंवा पळून जाण्याची प्रतिक्रिया सक्रिय करतं.
- राग किंवा तणावाच्या वेळी शरीरात अॅड्रेनालिन आणि कॉर्टिसोलसारखे स्ट्रेस हार्मोन्स वाढतात. यामुळे शरीर अचानक सतर्क होतं आणि हात-पाय थरथरू लागतात.
- रागाच्या वेळी शरीरातील स्नायू लढण्यासाठी किंवा पळण्यासाठी तयार होतात. स्नायूंमध्ये ताण वाढल्यामुळे त्यांचं आकुंचन आणि प्रसरण वेगाने होऊ शकतं. परिणामी शरीरात कंप जाणवतो.
- तणावपूर्ण परिस्थितीत हृदयाचे ठोके वेगाने पडू लागतात आणि श्वासोच्छ्वासही जलद होतो. या शारीरिक बदलांमुळे अस्वस्थता, थरथर आणि कधी कधी सुन्नपणाही जाणवू शकतो.
- वादाच्या वेळी शरीर कापणं हे केवळ भीतीचं लक्षण नाही. तीव्र राग, मानसिक तणाव, भावनिक अस्वस्थता किंवा अतिउत्तेजना यांमुळेही असं होऊ शकतं. परिस्थिती शांत झाल्यावर शरीर हळूहळू पूर्ववत होतं.
Loading...
{{{html}}}
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us