AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अदानींचा 8000 कोटींचा प्रकल्प, माधुरी हत्ती गुजरातला नेली, पण…; राजू शेट्टींनी सगळा जुना इतिहास काढला, गोकुळवरून दिला मोठा इशारा

माजी खासदार राजू शेट्टी यांनी गोकुळच्या निर्णयावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. अदानी प्रकल्प ते माधुरी हत्तीचा इतिहास काढत राजू शेट्टी यांनी जोरदार टीका केली.

अदानींचा 8000 कोटींचा प्रकल्प, माधुरी हत्ती गुजरातला नेली, पण...; राजू शेट्टींनी सगळा जुना इतिहास काढला, गोकुळवरून दिला मोठा इशारा
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 09, 2026 | 2:22 PM
Share

कोल्हापुरातील ‘गोकुळ’वरुन राजकारण पेटलं आहे.  गोकुळच्या शासन नियुक्त संचालकाच्या निर्णयाविरोधात सतेज पाटलांच्या नेतृत्वात हजारोंचा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात महायुतीच्या नेत्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्यात आली. मोर्चा काढल्यानंतर जाहीर सभेतून माजी खासदार राजू शेट्टी यांनी गोकुळवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार आगपाखड केली. यावेळी राजू शेट्टी यांनी जुना इतिहास काढत सरकारवर टीका केली.

माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, ‘एवढ्या मोठ्या संख्येने जनता एकवटली आहे. त्यांना वाटलं की, पाच हजार ठरावधारकांना मॅनेज करून गोकुळवर कब्जा करता येईल. पण त्यात यश आलं नाही. कारण हे कोल्हापूर आहे. मग…कोरमचं नाटक करून बैठका पुढे ढकलण्याचा डाव झाला. आता रडीचा डाव खेळत आहे. रडीचा डाव म्हणजे भाजप आणि त्यांचे पाय चाटणारे मित्र पक्ष..यांना सहकार कधीच कळाला नाही.  वैकुंठराव मेहता, विठ्ठलराव विखे पाटील, धनंजयराव गाडगीळ असतील. या नेत्यांनी सहकारची पाळेमुळे रोवली. ती रोवत असताना प्रत्येक सहकारी संस्थेत स्वीकृत सदस्यांची तरतूद करून ठेवली. पण आजपर्यंत स्वीकृत सदस्यांना मतदानाचा अधिकार दिला नाही’.

‘सहकारचा कायदा देखील हेच सांगतो. लोकांमधून निवडून आलेले संचालक असतील. एखाद्या विषयातील तज्ज्ञ नसतील. म्हणून संचालकांना निर्णय घेण्यासाठी निर्णय चुकू नये, कायदेशीर सल्ला देण्यासाठी स्वीकृत संचालकांची संकल्पना आणली. पण आजपर्यंत महाराष्ट्रात स्वीकृत संचालकांना मतदानाचा अधिकार नव्हता.    महाराष्ट्रातच नव्हे,देशात कुठे नव्हता. असाच प्रयत्न गुजरातमध्ये 2020 साली केला. तो प्रयत्न हाणून पाडण्यात आला. आपली भूमिका चुकीची नाही. या प्रकरणात कोर्टात सुनावणी सुरू आहे. कोर्टात आजचा संदेश पोहोचला आहे. कोर्टाने दीडदमडीच्या राजकीय नेत्यांच्या दबावाला बळी पडून निर्णय दिला, तर या लोकांचा न्यायावरील विश्वास उडाल्याशिवाय राहणार नाही. याची मला खात्री आहे. आता कोर्टाने ड्रोनवरून फोटो मागवून घ्यावेत. भाड्याने आलेले लोक नाहीत. हे आडलेले लोक नाहीत. सर्व लोक गोकुळ वाचवायला आले आहेत. कोल्हापूरकरांनी ठरवलं तर ठरवलं. यांनी एकदा टोल आणला.  त्यांचा टोल घालवला. अदानी पॉवर प्रोजेक्ट आणला होता. पण 8000 कोटी रुपयांचा प्रकल्प पळवून लावला. नाशिकचं पाणी गुजरातला..माधुरी हत्ती गुजरातला…नेली. ती सुद्धा परत आणली. हा कोल्हापूर जिल्हा हा राजर्षी शाहू महाराजांचा जिल्हा आहे. गोकुळची निवडणुकीचं नोटिफिकेशन पुन्हा वाचावे, असे राजू शेट्टी पुढे म्हणाले.

Follow Us
दुष्काळग्रस्तांना मोठा दिलासा! पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून उपाययोजना,
दुष्काळग्रस्तांना मोठा दिलासा! पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून उपाययोजना, जनावरांसाठी 500 एकरांवर चारा लागवड
मला धमक्या येतात, म्हणुन काही... विवेकानंद पाटील यांचा एल्गार
Vivekanad Patil At Kolhapur : मला धमक्या येतात, म्हणुन काही... विवेकानंद पाटील यांचा एल्गार
गोकुळच्या षडयंत्रामागे दादांचा हात; विवेकानंद पाटलांचा रोख कोणाकडे?
Vivekanand Patil : गोकुळच्या षडयंत्रामागे पुण्याच्या दादांचा हात; विवेकानंद पाटलांचा रोख कोणाकडे?
गोकुळ दूध संघात ‘चेअरमन की चोरमन?’; नामनिर्देशित सदस्यांच्या मतदान...
गोकुळ दूध संघात ‘चेअरमन की चोरमन?; नामनिर्देशित सदस्यांच्या मतदान हक्कावरून विवेकानंद पाटील आक्रमक!
सुनील तटकरे कुणाचेही होऊ शकत नाहीत; रामदास कदमांचा गंभीर आरोप....
Ramdas Kadam Vs Sunil Tatkare : सुनील तटकरे कुणाचेही होऊ शकत नाहीत; रामदास कदमांचा गंभीर आरोप, औकातीत राहा, अन्यथा....
पोहरादेवीत मनोज जरांगे पाटील नतमस्तक; बाबूसिंग महाराजांच्या भेटीने राज
Manoj Jarange Patil : पोहरादेवीत मनोज जरांगे पाटील नतमस्तक; बाबूसिंग महाराजांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण!
महाराजांना आपल्या कृतीतून आनंद मिळायला हवा! राज ठाकरेंचं इतिहासाबाबत..
Raj Thackeray Speech : महाराजांना आपल्या कृतीतून आनंद मिळायला हवा! राज ठाकरेंचं इतिहासाबाबत परखड भाष्य; नेमकं काय म्हणाले?
कोल्हापुरात सतेज पाटलांचा एल्गार! गोकुळ दूध संघाच्या संघर्षविरोधात...
कोल्हापुरात सतेज पाटलांचा एल्गार! गोकुळ दूध संघाच्या कथित गैरव्यवहाराविरोधात संघर्ष मोर्चा, म्हशींसह रस्त्यावर उतरले आंदोलक
सतेज पाटील यांचा कोल्हापुरात संघर्ष मोर्चा; वातावरण तापलं, व्हिडिओ बघा
Gokul : सतेज पाटील यांचा कोल्हापुरात संघर्ष मोर्चा; वातावरण तापलं, व्हिडिओ बघा
गोकुळच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा; काळे झेंडे, म्हशी..
Gokul Protest : गोकुळच्या मुद्द्यावरून कोल्हापुरात शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा; काळे झेंडे, म्हशी अन् पारंपरिक साहित्य घेऊन रस्त्यावर