शाहरुख खानला झाप झाप झापलं! शूटिंग सुरु असतानाच डायरेक्टरचा पारा चढला अन् सगळे पाहतच राहिले
शाहरुख आणि फराह खान यांच्यातील मैत्री सगळ्यांना माहिती आहे. या दोघांनीही सुपरहिट सिनेमे एकत्र केले आहेत, फराहच्या सिनेमांना निर्माता म्हणून शाहरुखच असतो पण आता त्यांच्यातील एक नवा किस्सा समोर आला आहे.

शाहरुख खान हा बॉलीवूडचा किंग आहे. त्याचा ओम शांती ओम हा खूप लोकप्रिय सिनेमा आहे पण या सिनेमाच्या चित्रिकरणादरम्यान एक रंजक किस्सा घडला होता.
शाहरुख खान आणि फराह खान यांची घट्ट मैत्री असली तरी, ओम शांती ओमच्या शूटिंगदरम्यान फराह चक्क शाहरुखवर ओरडल्याचा किस्सा समोर आला आहे.
फराह खान सेटवर एक अतिशय शिस्तबद्ध दिग्दर्शिका म्हणून ओळखली जाते आणि कामाच्या बाबतीत ती कोणतीही तडजोड करत नाही. समोर बॉलिवूडचा बादशाह असला तरी, कामात कसूर झाल्यावर तिने शाहरुखलाही सोडले नव्हते.
शूटिंगदरम्यान कामातील चुकीमुळे किंवा उशिरा आल्या कारणाने फराहने शाहरुखला सर्वांसमोर सुनावले होते. स्वतः शाहरुखनेही अनेकदा मुलाखतींमध्ये फराहच्या या रागीट पण तितक्याच प्रेमळ स्वभावाचा उल्लेख केला आहे.
दरम्यान, शाहरुख या चित्रपटाचा मुख्य अभिनेता आणि निर्माता दोन्ही होता, तरीही फराहने दिग्दर्शिका व मैत्रीण म्हणून त्याच्यावर हक्काने राग व्यक्त केला होता. त्यांच्यातील या नात्यामुळेच सेटवर शिस्तीचे आणि मजेदार वातावरण होते.
या चित्रपटाला अनेक वर्षे झाली असली तरी, पडद्यामागचे असे भन्नाट किस्से आजही प्रेक्षकांचे आणि चाहत्यांचे लक्ष वेधून घेतेता. या किश्श्यामुळेही बॉलिवूड प्रेमी आणि शाहरुख-फराहच्या चाहत्यांच्या जुन्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत.