
तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की काही ठराविक लोकांना पाहिलं की कुत्रे भुंकायला लागतात. या लोकांना पाहिलं की कुत्रे चांगलेच आक्रमक होतात. पण यामागे नेमकं कारण काय आहे? हे अनेकांना माहिती नाही. त्यामुळे कुत्रे भुंकण्यामागे नेमके कारण काय असते? हे जाणून घेऊ या...

कुत्र्यांची इंद्रीये माणवी इंद्रीयांच्या तुलनेत कित्येक पटीने जास्त काम करतात. कुत्र्याला व्यक्तीची चालण्याची क्रिया, त्याची हालचाल लगेच कळते. कुत्रा मानवी हालचालीवर बारीक लक्ष ठेवून असतो. म्हणूनच तो अनेकदा लोकांना ओळखतो. पण काही विशिष्ट लोकांना पाहिलं की तोच कुत्रा भुंकायला लागतो.

तुम्ही शांतपणे, न घाबरता कुत्र्याच्या समोरून गेले की तो शक्यता भुंकत नाही. पण तुम्ही घाबरत चालत असाल, तुमच्या चालण्यात भीती असेल तर कुत्रा लगेच भुंकायला लागतो. आपल्याला धोखा आहे, असे कुत्र्याला वाटते म्हणूनच तो भुंकतो.

कुत्र्यांची स्मरणशक्ती फार तल्लख असते. कुत्रा त्याच्यासोबत घडलेल्या गोष्टी शक्यतो विसरत नाही. भूतकाळात एखाद्या व्यक्तीने कुत्र्याला मारहाण केली किंवा त्याच्यावर हल्ला केलेला असेल तर कुत्रा अशा व्यक्तींना पाहताच भुंकतो.

दरम्यान, व्यक्तीपासून आपल्या धोका आहे, असे वाटताच कुत्रा भुंकायला लागतो. स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करतो. पण कुत्रा सतत भुंकत असेल तर फारसे घाबरून जाऊ नका. त्याच्याशी ओळख करावी. कुत्र्याशी एकदा ओळख झाली की नंतर तो तुमचा मित्र होतो.