पंखा फिरत असताना धूळ खाली का पडत नाही? तुम्हाला आतापर्यंत कोणीही सांगितलं नसेल लॉजिक

उन्हाळ्यात वेगाने फिरणाऱ्या पंख्याच्या पात्यांवर धूळ कशी जमा होते आणि त्याचा हवेवर काय परिणाम होतो, यामागचे रंजक वैज्ञानिक कारण या लेखात वाचा.

| Updated on: Apr 30, 2026 | 2:24 PM
1 / 6
उन्हाळ्यात घरातील पंखे दिवस-रात्र फिरत असतात. सतत हवेत फिरत असूनही काही दिवसांतच पात्यांच्या कडांवर काळ्या धुळीचा जाड थर जमा होतो.  पण इतक्या वेगाने फिरणाऱ्या पंख्याच्या पात्यांवर धूळ नेमकी येते कुठून? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

2 / 6
जेव्हा पंखा हवेत फिरतो, तेव्हा पात्यांचे हवेसोबत घर्षण होते. यामुळे पात्यांवर एक प्रकारचा करंट (Static Charge) तयार होतो. हवेत फिरणारी धूळ या प्रभारामुळे पात्यांकडे खेचली जाते. एखाद्या चुंबकाप्रमाणे कडेला जाऊन चिकटते

3 / 6
तुम्हाला वाटेल पंख्याजवळ खूप वारा असतो, पण विज्ञानानुसार पात्यांच्या अगदी चिकटून असलेल्या हवेचा थर अतिशय संथ असतो. या थरात हवा फारशी हलत नाही, त्यामुळे धुळीचे बारीक कण तिथे आरामात जाऊन बसतात. त्यामुळे पंखा कितीही जोरात फिरला, तरी या थरातील धूळ बाहेर फेकली जात नाही.

4 / 6
आपल्याकडे हवेत ओलावा जास्त असतो. या ओलाव्यामुळे धूळ थोडी चिकट होते. एकदा का ही चिकट धूळ पात्यांवर बसली की, ती पंख्याच्या वेगानेही निघत नाही. उलट, त्यावर धुळीचे एकावर एक थर साचत जातात.

5 / 6
पात्यांवर धूळ साचली की पंखा जड होतो आणि हवा कापण्याची त्याची ताकद कमी होते. परिणामी, पंखा पूर्ण वेगाने फिरूनही आपल्याला हवी तशी हवा मिळत नाही. त्यामुळे अधूनमधून पंखा पुसणे फायद्याचे ठरते.

6 / 6
त्यामुळे, यंदाच्या उन्हाळ्यात फक्त पंख्याच्या वेगाकडेच नाही, तर त्याच्या स्वच्छतेकडेही लक्ष द्या; जेणेकरून तुम्हाला मिळेल शुद्ध आणि भरपूर गार हवा मिळेल.

Follow Us