AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रावरुन मंत्री चंद्रकांत पाटील यांचा शरद पवारांना खोचक टोला

"विरोधकांना पुढील अडीच ते तीन वर्षे काही काम नाही. त्यामुळे त्यांना तेवढी वर्ष काहीतरी सारखं चालू ठेवायला लगाणार" असा टोला दुष्काळावरून टीका करणाऱ्या विरोधकांना मंत्री चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे.

देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रावरुन मंत्री चंद्रकांत पाटील यांचा शरद पवारांना खोचक टोला
Sharad Pawar-Devendra Fadnavis
| Updated on: Sep 20, 2026 | 6:28 PM
Share

शंकर देवकुळे, प्रतिनिधी : नुकतचं शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलं. राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपायोजना करण्यासाठी शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिलं. त्या पत्रावरुन चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांना खोचक टोला लगावला आहे. “पत्र देऊन जागे होणारे,असंवेदनशील मुख्यमंत्री नाहीत. संवेदनशील मुख्यमंत्री आहेत” असा खोचक टोला भाजपाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांना लगावला आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते. “कर्नाटक सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्याबाबत जे केलं ते विरोधकांनी आमच्या निदर्शनास आणून द्यावे” असं खोचक आवाहन मंत्री चंद्रकांत पाटलांनी केलं आहे.

विरोधकांकडून कर्नाटक सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे, महाराष्ट्र सरकार का करत नाही,असा सवाल करण्यात आला आहे. यावर बोलताना चंद्रकांत पाटलांनी “कर्नाटक राज्य देखील नियमांवर चालणारे राज्य आहे. कर्नाटक मध्ये जे काही चाललंय ते लक्षात आणून द्यावं,नियमाप्रमाणे त्यांनी आधी काय केलं,याचा अभ्यास करू” असं देखील मंत्री चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केले आहे.

दुर्बीण घेऊन शोधण्याचे काम चालू आहे

“निवडणूक लांब असल्याने विरोधकांचे रोज दुर्बीण घेऊन शोधण्याचे काम चालू आहे, आज काय बोलता येईल, रोज सकाळी एकत्र येऊन ठरवतात,आज काय बोलता येईल” असा खोचक टोला शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी काजू-बदाम टिकेवरून विरोधकांना लगावला आहे. कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या दुष्काळी दौऱ्यादरम्यान खालेल्या काजू-बदाम वरून टिका सुरु आहे. अशा परिस्थितीमध्ये नव्हे तर एरव्ही देखील काजू-बदाम खाणं योग्य नाही,असे देखील स्पष्ट केलंय,ते सांगली मध्ये बोलत होते.

त्यामुळे त्यांनी पाठ थोपटून घ्यावी

“प्रत्येकाने आपली पाठ थोपटून घ्यायची असते. त्यामुळे त्यांनी पाठ थोपटून घ्यावी” असा टोला भाजपाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांना लगावला आहे. हे सरकार आपलं काम कर्तव्यदक्षपणाने करतय,असं स्पष्ट केलं आहे.

हा दुष्काळ जाहीर करण्याचा मुहूर्त नाही

“पाच ऑक्टोंबर हा दुष्काळ जाहीर करण्याचा मुहूर्त नाही. पण त्याआधी काही गोष्टी करायच्या आहेत. त्याचं काम सुरू आहे. त्यामुळे निकषानंतर ते निश्चित करण्यात येईल आणि शेतकऱ्यांचे जे नुकसान झालं आहे, ते नियमाप्रमाणे दिले जाईल” असं देखील मंत्री चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल