निवडणूक आयोगाकडून आडवाणी, एस. जयशंकर यांना नोटीस, नेमकं कारण काय?
एसआयआर (SIR) प्रक्रियेदरम्यान निवडणूक आयोगाकडून अनेक दिग्गज राजकीय नेत्यांना देखील नोटीस पाठवण्यात आली आहे. यामध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि एस. जयशंकर यांचा देखील समावेश आहे.

एसआयआर (SIR) प्रक्रियेदरम्यान निवडणूक आयोगाकडून अनेक दिग्गज राजकीय नेत्यांना देखील नोटीस पाठवण्यात आली आहे. विविध बाबींच्या संदर्भात मतदार यादीशी संबंधित नोंदींच्या पडताळणीबाबत निवडणूक आयोगाकडून ही नोटीस पाठवण्यात आली आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या रिपोर्टनुसार भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी तसेच परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, निवडणूक आयुक्त एसएएस संधू, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार कपिल सिब्बल, काँग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांना एसआयआर प्रक्रियेदरम्यान नोटीस पाठवण्यात आली आहे.
निवडणूक आयुक्त एसएएस संधू यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. निवडणूक रेकॉर्डनुसार त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये फरक आढळून आल्याने त्यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि त्यांच्या पत्नीचं नाव देखील या यादीमध्ये आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांची माहिती निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डशी मेळ खात नसल्यामुळे त्यांना देखील नोटीस पाठवण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या कुटुंबातील इतर काही व्यक्तींना देखील नोटीस पाठवण्यात आली आहे.
नोटीस का पाठवली?
एका रिपोर्टनुसार अनेक दिग्गज राजकीय नेत्यांना निवडणूक आयोगाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. एसआयआर रेकॉर्डमध्ये नावात आढळून आलेली विसंगती, नावाच्या स्पेलिंगमध्ये असलेला फरक, माहिती न जुळणे, जुन्या रेकॉर्डसोबत नाव न जुळणे, तसेच इतर काही कारणांमुळे या नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. विविध बाबींच्या संदर्भात मतदार यादीशी संबंधित नोंदींच्या पडताळणीबाबत निवडणूक आयोगाकडून ही नोटीस पाठवण्यात आली आहे. एसआयआर प्रक्रियेची सुरुवात सर्वात आधी बिहारमध्ये करण्यात आली होती. 24 जून 2025 रोजी बिहारमध्ये एसआयआर प्रक्रियेला सुरुवात झाली होती. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये छत्तीसगड, गोवा, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये ही एसआयआरची प्रक्रिया पार पडली, या प्रक्रियेदरम्यान अनेकांची नाव मतदार यादीमधून वगळण्यात आली आहेत.
