धावत्या कारमध्ये अचानक झोप का येते? 99 टक्के लोकांना कारण माहीत नाही
अनेकांना कारमध्ये बसल्यावर झोप येण्यास सुरूवात होते. तर अनेकांना कार चालवाताना देखील डुल्क्या लागतात. जाणून घ्या कारण

काही जणांना चार चाकी वाहनात बसल्या बसल्या झोप येण्यास सुरुवात होते. धक्कादायक बाब म्हणजे कधी कधी चालकाच्या सीटवर बसलेल्या चालकाला देखील धावत्या कारमध्ये झोप येते. त्यामुळे अनेक मोठ्या दुर्घटना घडतात.
तुम्ही कारमध्ये बसला आहात. प्रवास हा लांब पल्ल्याचा असेल. त्यावेळी तुम्हाला झोप येण्याची शक्यता असते. कारमधील शांत वातावणामुळे काही वेळात प्रवाशाला झोप यायला सुरुवात होते.
धावत्या कारमध्ये झोप येण्यामागे अनेक कारण असू शकतात. याला मेंदूची क्रियाशीलता, पर्यावरणीय घटक इत्यादी कारणीभूत ठरतात. वाहवाचा वेग, एक सारखे व्हायब्रेशन आणि आसपासच्या वातावणामुळे मन शांत होते, त्यामुळे झोप लागण्यास सुरुवात होते.
तसेच कारमध्ये बसल्यानंतर शरीराची हालचाल कमी होते. कारमध्ये शांत बसल्याने शरीराची हालचाल कमी होते. त्यामुळे मेंदूला झोप लागण्यास सुरुवात होते.
खरंतर कारमध्ये बसल्यानंतर एक सारखेच व्हायब्रेशन सातत्याने निर्माण होतात. कारमध्ये बसल्याने मेंदूच्या क्रियाशीलतेची गरज कमी भासते. त्यामुळे एक शांत भावना निर्माण होऊन झोप लागते.