Gas Cylinder Design : गॅस सिलेंडर नेहमी गोलच का असतो ? नेहमी वापरणाऱ्यांनाही हे कारण नसेल माहीत

Gas Cylinder Design : कधी नीट लक्ष दिलं असेल तर तुमच्या लक्षात येईल गॅस सिलिंडर आणि तेलाचे टँकर नेहमी गोल असतात. पण ते तसे का असतात, याचं कारण फारच कमी लोकांना माहीत असेल.

| Updated on: Mar 23, 2026 | 2:11 PM
1 / 6
Gas Cylinder Design : मध्य पूर्वेतील युद्धामुळे एलपीजी पुरवठा विस्कळीत झाल्याने, सध्या गॅस सिलिंडर आणि तेल टँकर यांसारख्या विषयांवर सतत चर्चा सुरू आहे. या गोष्टी दैनंदिन जीवनात वापरात असल्या तरी सिलेंडर, टँकर नेहमी गोल का असतात याचा विचार फार कमी लोकांनी केला असेल. चला, त्याबद्दल अधिक जाणून घेऊया.

Gas Cylinder Design : मध्य पूर्वेतील युद्धामुळे एलपीजी पुरवठा विस्कळीत झाल्याने, सध्या गॅस सिलिंडर आणि तेल टँकर यांसारख्या विषयांवर सतत चर्चा सुरू आहे. या गोष्टी दैनंदिन जीवनात वापरात असल्या तरी सिलेंडर, टँकर नेहमी गोल का असतात याचा विचार फार कमी लोकांनी केला असेल. चला, त्याबद्दल अधिक जाणून घेऊया.

2 / 6

जेव्हा वायू किंवा द्रव एखाद्या पात्रात किंवा सिलेंडरमध्ये साठवला जातो, तेव्हा तो त्याच्या भिंतींवर सर्व दिशांनी दाब टाकतो. पात्र गोल किंवा दंडगोलाकार असल्यामुळे, हा दाब त्याच्या संपूर्ण पृष्ठभागावर समान रीतीने पडतो. जर सिलेंडरला कोपरे असते, तर दाब त्या कोपऱ्यांवर केंद्रित झाला असता, ज्यामुळे त्याला तडा जाण्याचा किंवा त्याचा स्फोट होण्याचा धोका वाढला असता.

3 / 6

गोलाकार टाक्यांना तीक्ष्ण कडा किंवा कोपरे नसतात. एखादा अपघात झाला किंवा टक्कर झाल्यास, दंडगोलाकार टाक्या तो धक्का अधिक प्रभावीपणे शोषून घेऊ शकतात. तसेच चौरसाकार टाक्यांच्या तुलनेत गोलाकार टाक्या फुटण्याची शक्यता कमी असते.

4 / 6

तेलवाहू जहाजे सतत हालचाल करत असतात, तसेच त्यांना सतत कंपन आणि बाह्य दाबाला सामोरं जावं लागतं. मात्र गोलाकार आकारामुळे अधिक संरचनात्मक स्थिरता मिळते, ज्यामुळे आलेला दाब ते जहाज सहजपणे सहन करू शकतं. तसेच गोलाकार किंवा दंडगोलाकार टाक्या स्वच्छ करणे खूप सोपं असतं, कारण त्यांना कोपरे नसतात, ज्यामुळे धूळ, घाण किंवा तेल साचत नाही. यामुळे देखभाल करणंही सोपं होतं.

5 / 6

गॅस सिलिंडर हे सामान्यतः कमी कार्बन स्टील किंवा स्टेनलेस स्टीलपासून बनवलेले असतात. ते न फुटता जास्त दाब सहन करू शकतात. मात्र अलीकडच्या काळात, फायबरग्लाससारखे आधुनिक संमिश्र पदार्थ वापरात आले आहेत. हे वजनाने हलके, गंजरोधक आणि हाताळण्यास अतिशय सोपे असतात.

6 / 6

तर तेलाचे टँकर हे बहुतेकदा ॲल्युमिनियम मिश्रधातू किंवा स्टेनलेस स्टीलचे बनवलेले असतात. ॲल्युमिनियमला ​​प्राधान्य दिलं जातं कारण ते वजनाने हलकं आणि सुरक्षित असतं, आणि त्यात सहज स्पार्क होत नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us