
'दिल मिल गए' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता करण सिंह ग्रोवरने 2012 मध्ये अभिनेत्री जेनिफर विंगेटशी लग्न केलं होतं. मालिकेच्या सेटवर हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते.

जेनिफर आणि करणचं लग्न मात्र फक्त दोन वर्षेच टिकलं. लग्नाच्या दोन वर्षांनंतर 2014 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. यामागचं नेमकं कारण काय होतं, हे कोणालाच समजू शकलं नव्हतं.

जेनिफर आणि करणच्या राहणीमानात, विचारांमध्ये बराच फरक होता, यामुळे दोघांमध्ये सतत भांडणं व्हायची, असं म्हटलं गेलं. 'दिल मिल गए'च्या सेटवर दोघं लगेच एकमेकांकडे आकर्षित झाले. परंतु एकमेकांना समजण्यासाठी त्यांनी पुरेसा वेळ घेतला नव्हता.

हे मतभेद एका टप्प्यानंतर इतक्या टोकाला पोहोचले की त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सततच्या भांडणांमुळे दोघांच्या नात्यात प्रचंड कटुता निर्माण झाली होती.

जेनिफरला घटस्फोट दिल्यानंतर करणने अभिनेत्री बिपाशा बासूशी तिसरं लग्न केलं. या दोघांना एक मुलगी आहे. तर जेनिफर अद्याप सिंगलच आहे.