बाथरूमचा दरवाजा नेहमी बंद ठेवणे ठरू शकते धोकादायक! संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर
बाथरूममध्ये फ्लश केल्यावर हवेत सूक्ष्म जंतू आणि एरोसोल कण पसरू शकतात. योग्य वायुवीजन नसल्यास हे कण बंद जागेत काही काळ राहू शकतात.

फ्लश केल्यावर हवेत पसरतात सूक्ष्म कण: टॉयलेट फ्लश करताना हवेत अतिशय सूक्ष्म एरोसोल कण पसरतात. यामध्ये बॅक्टेरिया आणि इतर सूक्ष्मजीव असू शकतात, जे काही काळ हवेत टिकून राहू शकतात.
दरवाजा बंद असल्यास वाढू शकतो धोका: बाथरूममध्ये योग्य वायुवीजन नसेल आणि दरवाजा सतत बंद असेल, तर हवेत पसरलेले कण बाहेर जाण्यास अडथळा येऊ शकतो. त्यामुळे बंद जागेत या कणांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते.
बाथरूमच्या पृष्ठभागांवरही पसरतात जंतू: फ्लशमधून बाहेर पडणारे सूक्ष्म कण वॉशबेसिन, दरवाजाचे हँडल आणि इतर पृष्ठभागांवर जमा होऊ शकतात. त्यामुळे या ठिकाणांची नियमित स्वच्छता करणे आवश्यक आहे.
एक्सॉस्ट फॅनचा वापर ठरतो महत्त्वाचा: बाथरूममधील दूषित हवा बाहेर काढण्यासाठी एक्सॉस्ट फॅनचा वापर करावा. योग्य वायुवीजनामुळे हवेत साचणारे सूक्ष्म कण कमी होण्यास मदत होऊ शकते.
फ्लश करण्यापूर्वी टॉयलेटचे झाकण बंद करा: फ्लश करण्यापूर्वी टॉयलेटचे झाकण बंद करण्याची सवय लावा. तसेच बाथरूममध्ये हवा खेळती ठेवा आणि दरवाजाचे हँडल, नळ व इतर वारंवार स्पर्श होणाऱ्या जागा नियमित स्वच्छ करा.