Arshdeep Singh Samreen Kaur: निळाशार समुद्रासमोर गुडघ्यावर बसून अर्शदीपनं समरीन केलं प्रपोज, Engagement Ring ची किंमत ऐकून व्हाल शॉक
Arshdeep Singh Samreen Kaur Enagnement Ring Price: अर्शदीप सिंगने काल त्याच्या गर्लफ्रेंडला प्रपोज केले. त्यानं एक सुंदर डायमंड अंगठी तिला घातली. आता या अंगठीची किमत किती आहे ते जाणून घ्या...

Arshdeep Singh Samreen Kaur Enagned: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्याने नुकतेच पंजाब किंग्स संघ सोडून एका ट्रेड डीलद्वारे मुंबई इंडियन्समध्ये प्रवेश केला होता. एकाच दिवशी अर्शदीपने चाहत्यांना दोन सुखद धक्के दिले. एक तर मुंबईमध्ये सामील झाल्याने मुंबईचे चाहते भलतेच खुश झाले. तर दुसरी बातमी म्हणजे प्रेयसी समरीन कौरला प्रपोज केले. आता तिच्या अंगठीच्या किमतीची चर्चा रंगली आहे.
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये, अर्शदीप सिंग एका गुडघ्यावर बसून समरीन कौरला प्रपोज करताना दिसत आहे. तिच्या बोटात अंगठी घालण्यासाठी अर्शदीप गुडघ्यावर बसलेला दिसत आहे. अर्शदीपने त्यांच्या आयुष्यातील हा सुंदर क्षण न्यूझीलंडमध्ये घालवला. अर्शदीप आणि समरीनने हे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
View this post on Instagram
सोशल मीडियावर फोटो शेअर करताना अर्शदीप आणि समरीनने लिहिले, “आयुष्याने आम्हाला जे काही दिले असते, त्यापैकी सर्वात मोठा आनंद हा आहे की त्याने आम्हाला एकमेकांची साथ दिली. या आयुष्यभराच्या सोबतीसाठी, ११.११.२०२६ (hey fiancé).
अर्शदीप आणि समरीन बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. समरीन अनेक पंजाबी म्युझिक व्हिडिओंमध्ये दिसली आहे. तिचा ग्लॅमरस लूक चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. समरीन ‘८३’ या बॉलिवूड चित्रपटातही दिसली होती. तिची भूमिका छोटी होती. याव्यतिरिक्त, समरीनने ‘नेलपॉलिश’ सारख्या वेब फिल्म्स आणि अनेक हिट पंजाबी गाण्यांमध्ये काम केले आहे. समरीन ‘मिस इंडिया जम्मू आणि काश्मीर’ देखील राहिली आहे.
अर्शदीप सिंगने गर्लफ्रेंड समरीनला दिलेली ही अंगठी टिफनी ऍन्ड कंपनीची आहे. या रिंगच्या मध्यभागामध्ये असलेला डायमंड हा एक कॅरेटचा असल्याचे समजत आहे. टिफनी हार्मोनी हा अमेरिकन ब्रँड असून अर्शदीपने गर्लफ्रेंडला दिलेल्या रिंगची किंमत जवळपास 14.89 लाख रुपयांची असल्याचं सांगितले जात आहे. टिफनी हार्मोनी कंपनीच्या 0.91 कॅरेटची किंमत 14.89 लाख रुपये आहे. Tiffany & Co च्या अधिकृत वेबसाईटवर या सर्व रिंगची डिझाईन आणि त्याची किंमतही उपलब्ध आहे.
