AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Terror Attack: किश्तवाडमध्ये बेपत्ता पोलिसांचे मृतदेह सापडले, दहशतवाद्यांशी धुमश्चक्रीदरम्यान सुरू होता शोध

Jammu And Kashmir Terror Attack: जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर बेपत्ता झालेल्या दोन पोलिसांचे मृतदेह भेटले. दहशतवाद्यांसोबतच धुमश्चक्रीनंतर दोन्ही जवानांचा संपर्क तुटला होता. त्यानंतर किश्वतवाड जिल्ह्यातील जंगलात सर्च ऑपरेशन राबवण्यात आले.

Terror Attack: किश्तवाडमध्ये बेपत्ता पोलिसांचे मृतदेह सापडले, दहशतवाद्यांशी धुमश्चक्रीदरम्यान सुरू होता शोध
किश्तवाडमध्ये बेपत्ता पोलिसांचे मृतदेह सापडले, दहशतवाद्यांशी धुमश्चक्रीनंतर सुरू होता शोध
| Updated on: Nov 12, 2026 | 10:25 AM
Share

Jammu And Kashmir Terror Attack: जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात बेपत्ता झालेल्या दोन विशेष पोलीस अधिकाऱ्यांचा (SPO) मृतदेह गुरुवारी सापडले. बुधवारी मारवाह जवळील देहरना जंगलात स्थानिकांनी गोळीबाराचा आवाज ऐकला होता. या भागातही दहशतवाद्यांशी चकमक उडाल्याचे समोर आले. या धुमश्चक्रीनंतर दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांचा मोबाईल बंद येत होता. त्यानंतर या जंगलात व्यापक शोध मोहिम हाती घेण्यात आली. दहशतवादी या परिसरात लपल्याचे समोर आल्यानंतर सुरक्षा दल सतर्क झाले आहे.

गोळीबाराच्या घटनेनंतर दोघेही बेपत्ता

प्राप्त माहितीनुसार, दोन्ही जवानांची ओळख पटली आहे. रशपाल कुमार(40) आणि बॉबी चंद (54) असे शहीद झालेल्या जवानांची नावं आहेत. ते स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपचे (SOG) सदस्य होते. 11 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन्ही जवान हे टेहाळणी आणि निगारणी करत होते. दोघेही या परिसरात गस्तीवर होते. ते त्यांच्या पोस्टवर जात होते. तेव्हाच त्यांचा संपर्क तुटला. त्यापूर्वी दुपारी जवळपास 3:30 वाजता या परिसरात गोळीबाराचा आवाज स्थानिकांनी ऐकला होता.

जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील दुर्गम दच्छन भागात बुधवारी ही घटना घडली. या भागात पोलीस अधिकारी बेपत्ता झाले होते. हे दोघे कियार या गावातील त्यांच्या कॅम्पमधून मरवाह या लष्कराच्या चौकीकडे जात होते. पण त्या कॅम्पपर्यंत पोहचण्यापूर्वीच ते बेपत्ता झाले होते. त्यांचे मोबाइलही बंद होते. स्थानिक लोकांनी या भागात गोळीबाराचा आवाज ऐकला. त्यानंतर पोलीस आणि लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्सने संयुक्त रूपाने शोध मोहीम राबवली.

2026 मध्ये चार दहशतवादी ठार

किश्तवाड जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात आणि जंगल परिसरात दहशतवादी लपल्याचे समोर आले होते. त्यानंतर सुरक्षा दलाने या परिसरात सातत्याने सर्च ऑपरेशन राबवले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, वर्ष 2026 मधील चकमकीत या परिसरात चार दहशतवादी ठार झाले तर एक जवान शहीद झाला होता. वर्ष 2025 मध्ये तीन दहशतवादी मारल्या गेले होते. तर एक जवान शहीद झाला होता. 2024 मध्ये तीन सुरक्षा कर्मचारी आणि दोन नागरिकांना प्राण गमवावा लागला होता.

Follow Us
भाऊ माझा मंत्री होऊ दे, सुषमा अंधारेंच्या मुंडेंना खास शुभेच्छा....
Sushma Andhare On Dhananjay Munde : भाऊ माझा मंत्री होऊ दे, सुषमा अंधारेंच्या मुंडेंना खास शुभेच्छा; परळीतील विधानाने राजकीय चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! दिवाळीनंतर प्रदूषणाचा पुन्हा धुरळा; AQI तब्बल...
Mumbai Air Pollution : मुंबईकरांनो सावधान! दिवाळीनंतर प्रदूषणाचा पुन्हा धुरळा; AQI तब्बल...
हार्बर मार्गावरील स्थानकांवर छठपूजेची गाणी; महाराष्ट्र संघर्ष समितीचा
Harbour Line : हार्बर मार्गावरील स्थानकांवर छठपूजेची गाणी; महाराष्ट्र संघर्ष समितीचा आक्षेप, रेल्वे प्रशासनावर आरोप
मॉर्निंग वॉकदरम्यान उपराष्ट्रपती जगदीप धनखड अचानक कोसळले; प्रकृती....
Jagdeep Dhankhar Health Update : मॉर्निंग वॉकदरम्यान उपराष्ट्रपती जगदीप धनखड अचानक कोसळले; प्रकृती बिघडल्याने AIIMS रुग्णालयात दाखल, डॉक्टरांची विशेष टीम तैनात
सुनील तटकरे वर्षा बंगल्यावर; मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट....
Sunil Tatkare Meets Devendra Fadnavis : सुनील तटकरे वर्षा बंगल्यावर; मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट, भेटीमागचं नेमकं कारण काय?
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 62,370 कोटींचं खत अनुदान मंजूर...
Rabi Season News : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 62,370 कोटींचं खत अनुदान मंजूर; DAP ची गोणी मिळणार फक्त एवढ्या रुपयांना
आजपासून ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका; अमूलचं दूध महागलं, प्रति लिटर
Amul Products Price Hike : आजपासून ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका; अमूलचं दूध महागलं, प्रति लिटर एवढ्या रुपयांची दरवाढ
जशी वेळ येईल तशा...; सुनेत्रा पवार यांनी सस्पेन्स वाढवला....
Sunetra Pawar : जशी वेळ येईल तशा...; सुनेत्रा पवार यांनी सस्पेन्स वाढवला, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर पडदा कधी उठणार?
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण