Liquor Facts : मद्य लाकडी बॅरेलमध्ये का ठेवले जाते? नेमके लॉजिक काय? वाचून चकित व्हाल!

आजकाल मद्याचा व्यापार खूप व्यापक झालाय. एका देशातून दुसऱ्या देशात मद्याची वाहतूक केली जाते. त्यामुळे मद्य खराब होऊ नये म्हणून ते शक्यतो लाकडी बॅरेलमध्ये ठेवले जाते.

| Updated on: Oct 24, 2026 | 9:27 PM
1 / 5
आजकाल मद्याचा व्यापार खूप व्यापक झालाय. एका देशातून दुसऱ्या देशात मद्याची वाहतूक केली जाते. त्यामुळे मद्य खराब होऊ नये म्हणून ते शक्यतो लाकडी बॅरेलमध्ये ठेवले जाते. परंतु मद्याची साठवणूक करण्यासाठी लाडकी बॅरलच का वापरले जाते? याचे कारण अनेकांना माहिती नाही.

आजकाल मद्याचा व्यापार खूप व्यापक झालाय. एका देशातून दुसऱ्या देशात मद्याची वाहतूक केली जाते. त्यामुळे मद्य खराब होऊ नये म्हणून ते शक्यतो लाकडी बॅरेलमध्ये ठेवले जाते. परंतु मद्याची साठवणूक करण्यासाठी लाडकी बॅरलच का वापरले जाते? याचे कारण अनेकांना माहिती नाही.

2 / 5

वाइन आणि व्हिस्की यांसारख्या मद्यांना अनेक वर्षे लाकडी बॅरलमध्ये साठवून ठेवले जाते. यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. ओकच्या लाकडापासून बनवलेल्या बॅरलमधील सूक्ष्म छिद्रांमधून मर्यादित प्रमाणात ऑक्सिजन आत जातो. या प्रक्रियेला मायक्रो-ऑक्सिजनेशन म्हणतात.

3 / 5

लाकडी बॅरलमध्ये मद्य साठवल्यामुळे त्याच्या चवीत आणि सुगंधात विशेष बदल होतो. ओकच्या लाकडातील व्हॅनिलिन, टॅनिन यांसारख्या घटकांमुळे मद्याला व्हॅनिला, दालचिनी, कॅरेमल आणि नारळासारख्या चवींची छटा मिळू शकते. मद्याचा प्रकार, लाडकी बॅरल किती जुने आहे यावरही मद्याच्या सुगंधात आणि चवीत फरक पडतो.

4 / 5

काच आणि स्टीलच्या भांड्यांमध्ये मद्य साठवल्यास लाकडामुळे मिळणाऱ्या चवी आणि सुगंधाचे बदल होत नाही. याउलट, लाकडी बॅरल मद्याच्या रंग, सुगंध आणि चवीवर परिणाम करते. त्यामुळे अनेक प्रीमियम व्हिस्कीच्या निर्मितीत त्यांचा वापर महत्त्वाचा असतो. प्रत्येक मद्याला लाकडी बॅरलमध्ये साठवणे आवश्यक नसते.

5 / 5

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us