
IPL 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सची टीम सुसाट निघाली आहे. यामागे एक माणूस आहे, तो म्हणजे गौतम गंभीर. KKR ने अन्य टीम्सना टेन्शन दिलय. गंभीरने फ्रेंचायजीमध्ये पुनरागमन केलय. आक्रमकता आणि स्पष्ट बोलण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या गौतम गंभीरने टीममध्ये सुद्धा तोच जोश निर्माण केलाय. त्याचा परिणाम मैदानावर दिसतोय. केकेआरने विजयाची हॅट्ट्रिक केलीय.

गौतम गंभीरची सर्वत्र चर्चा होतेय. या दरम्यान त्याच एक वक्तव्य चर्चेत आलय. हे त्याच वक्तव्य ऐकल्यानंतर प्रत्येकजण त्याला सलाम करेल. त्याच कौतुक करेल.

KKR टीमला 2012 आणि 2014 मध्ये गौतम गंभीरने त्याच्या नेतृत्वाखाली आयपीएलच जेतेपद मिळवून दिलं होतं. त्यानंतर तो त्याचा मूळ संघ दिल्लीला निघून गेला होता. दिल्ली टीमचा तो कॅप्टन होता. पण काही सामने खेळल्यानंतर त्याने श्रेयस अय्यरकडे दिल्लीच नेतृत्व सोपवलं.

गौतम गंभीरने आता काही वर्षानंतर त्या बद्दल खुलासा केलाय. गौतम गंभीरने त्या सीजनमध्ये फक्त कॅप्टनशिप सोडली नाही, त्या सीजनमध्ये 2.3 कोटी रुपयाची सॅलरी सुद्धा घेतली नव्हती. गौतम गंभीरने सांगितलं की, पैसा आणि पावर सोडण सोपं नसतं. पण त्याने असं केलं. कारण स्वत:च्या खराब प्रदर्शनामुळे आरशात तो स्वत:चा चेहरा पाहू शकत नव्हता.

गौतम गंभीरला असं करुन आपल्या मुलासमोर उद्हारण सादर करायच होतं. तुम्हाला तेच मिळालं पाहिजे, जे तुमच्या हक्काच आहे. त्या सीजनमध्ये प्रदर्शनाच्या आधारावर गौतमला वाटतं, कॅप्टनशिप आणि सॅलरीवर त्याचा अधिकार नव्हता.