हसताय ना? हसत राहा! हसण्याचे फायदे जाणून घ्या…

हसण्याचे अनेक फायदे आहेत. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तुम्ही जर हसरे असाल, सतत हसत असाल, सकारात्मक असाल तर तुमचा सहवास सगळ्यांना हवाहवासा वाटतो. सकारात्मकता कुणाला नको असते? वातावरण आनंदी राहते, काम चांगलं होतं. ताणतणाव कमी होतो म्हणून हसायचं. एक नाही अशी अनेक कारणे आहेत. याने आरोग्याचे सुद्धा खूप फायदे होतात. काय आहेत बघुयात...

| Updated on: Oct 08, 2023 | 3:36 PM
1 / 5
निरोगी आयुष्यासाठी चांगला आहार, भरपूर पाणी आणि हसत राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला वाटतं सारखंच हसल्याने काय होतं? असा काय फारसा फरक पडणार? हे आहेत फायदे...

2 / 5
हसत रहा, हसत रहा! असं आपण नेहमी ऐकतो, लोकं नेहमी हाच सल्ला देतात. असं का? मनापासून हळू हसा किंवा जोरजोरात हसा याने फारसा फरक पडत नाही. आपण हसतो तेव्हा मेंदू सेरोटोनिन, डोपामाइन आणि एंडोर्फिनसह आनंदी संप्रेरक सोडतो. हे संप्रेरक आपल्या वेदना कमी करत असतात. म्हणून हसा!

3 / 5
आपण हसलो की समोरचा हसतो, सगळेच हसतात. वातावरण आनंदी राहतं, सगळीकडे सकारात्मक ऊर्जा तयार होते. अशा वातावरणात राहायला कुणालाही आवडतं. सकारात्मक वातावरणात काम सुद्धा चांगलं होतं त्यामुळे हसणे महत्त्वाचे आहे.

4 / 5
तुम्ही कधी सेरोटोनिन संप्रेरक बद्दल ऐकलंय का? हसण्यामुळे सेरोटोनिन संप्रेरक बाहेर पडते आणि यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. यामुळे संसर्गाशी सुद्धा लढण्यास मदत होते. सेरोटोनिन संप्रेरक फक्त हसण्याने बाहेर पडते त्यामुळे साहजिकच हसणं खूप महत्त्वाचं आहे.

5 / 5
हसण्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. हृदयाचे ठोके सुरळीत राहतात. हसण्याने तणाव आणि नैराश्य दूर होतं. ताणतणावापासून दूर राहायचं असेल तर हसणं हा उत्तम उपाय आहे. तुम्ही कॉमेडी सिरीज बघू शकता. नाटक बघू शकता आणि खळखळून हसू शकता.