IND vs NZ : न्यूझीलंडचे प्लेयर्सही पाच दिवस मैदानात होते, ते सुद्धा थकले, मग ते जर..टीम इंडिया ओव्हर कॉन्फिडन्समध्ये का?

IND vs NZ : कुठल्याही मॅच आधी प्रॅक्टिस आवश्यक असते. पण टीम इंडियाने क्राइस्टचर्च मध्ये सराव केला नाही. दुसरा कसोटी सामना सुरु व्हायला अजून दोन दिवस बाकी आहेत. पहिली टेस्ट ड्रॉ झाली होती.

| Updated on: Nov 25, 2026 | 5:35 PM
1 / 5
भारत आणि न्यूझीलंडमधील दोन टेस्ट मॅचच्या सीरीजमधील शेवटचा कसोटी सामना क्राइस्टचर्च येथे होणार आहे. ही टेस्ट मॅच 27 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. पण त्याआधी आज 25 नोव्हेंबरला होणारं आपलं प्रॅक्टिस सेशन भारतीय संघाने रद्द केलं. (Photo: PTI)

भारत आणि न्यूझीलंडमधील दोन टेस्ट मॅचच्या सीरीजमधील शेवटचा कसोटी सामना क्राइस्टचर्च येथे होणार आहे. ही टेस्ट मॅच 27 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. पण त्याआधी आज 25 नोव्हेंबरला होणारं आपलं प्रॅक्टिस सेशन भारतीय संघाने रद्द केलं. (Photo: PTI)

2 / 5

प्रॅक्टिस सेशन रद्द होण्याचं कारण काय?. टीम इंडियाने क्राइस्टचर्च मध्ये असा निर्णय का घेतला?. खेळाडूंची रिकवरी हे यामागे एक कारण आहे. खबरदारी म्हणून भारतीय टीमने हा निर्णय घेतला आहे. खेळाडू चांगल्या पद्धतीने रिकवर होऊन दुसऱ्या टेस्टसाठी ताजेतवाने रहावेत हा त्यामागे हेतू आहे. (Photo: PTI)

3 / 5

भारत आणि न्यूझीलंडमधील पहिल्या आणि दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये फक्त तीन दिवसांचं अंतर आहे. टीम इंडियाने वेलिंग्टनहून क्राइस्टचर्चमध्ये ट्रॅव्हल सुद्धा केलं. त्याआधी पहिला कसोटी सामना पाच दिवस चालला. त्यामुळे खेळाडूंचं थकण स्वाभाविक आहे. थकवा आणि अन्य समस्या येऊ नयेत म्हणून भारतीय टीमने प्रॅक्टिस टाळली. (Photo: PTI)

4 / 5

टीम इंडियाने आपली प्रॅक्टिस रद्द केली. पण न्यूझीलंडच्या खेळाडूंनी 25 नोव्हेंबरला म्हणजे आजच क्राइस्टचर्चमध्ये प्रॅक्टिस जरुर केली. मॅट हेनरीने पत्रकार परिषद देखील घेतली. वेलिंगटनमध्ये न्यूझीलंडचे प्लेयर्स सुद्धा पाच दिवस मैदानावरच होते. ते सुद्धा थकले. पण त्यांनी प्रॅक्टिस केली. टीम इंडियाने का नाही केली? (Photo: PTI)

5 / 5

टेस्ट सीरीजमध्ये सध्या कुठलीही टीम आघाडीवर नाहीय. वेलिंग्टन टेस्ट ड्रॉ झाल्यानंतर क्राइस्टचर्च मध्ये विजय टीम इंडियासाठी खूप आवश्यक आहे. फक्त सीरीज जिंकणं एवढचं टीम इंडियासमोर टार्गेट नाहीय, तर WTC फायनलच्या अपेक्षा सुद्धा जिवंत राहणं महत्वाचं आहे. (Photo: PTI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us