
नेलकटर ही अशी वस्तू आहे, जी प्रत्येकाच्याच घरात असते. कारण ही वस्तू दिसायला छोटी असली तरीही ती फारच कामाची आहे. नेलकटरचा उपयोग प्रामुख्याने हात आणि पायाच्या बोटांचे नख कापण्यासाठी केला जातो.

तुम्ही बाजारात सहज चक्कर मारली तरीदेखील अनेक ठिकाणी तुम्हाला नेलकटर मिळेल. नेलकटर हे अगदी दहा रुपयांपासून ते पाचशे रुपयांपर्यंत मिळू शकते. काही लोकांना तर महागडे नेलकटर आवडतात. पण नेलकटरवर एक खास गोष्ट असते त्याबद्दल फारच कमी लोकांना कल्पना आहे.

नेलकटरवर एक छिद्र असते. या छिद्राचे नेमके काम काय असते, याची अनेकांना कल्पना नाही. खरं म्हणजे म्हणजे या छिद्राचे काहीच काम नाही, असा अनेकांचा समज आहे. पण नेलकटरवरील छिद्र हे अनेक अर्थांनी फार उपयोगी आहे.

नेलकटरवर असलेल्या छिद्राच्या मदतीने तुम्ही ते कुठेही सुरक्षित ठिकाणी लटकवू शकता. या छिद्रामध्ये की-चेन किंवा एखादा धागा टाकून तुम्ही त्याला कुठेही लटकवू शकता. तुम्हाला ते कुठेही घेऊन जाता येते आणि सामानामध्ये ते लगेच ओळखायला येते.

दरम्यान, नेलकटर हे नखे कापण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे ते स्वच्छ ठेवावे. त्याला जंग चढू देऊ नये. तसेच इतरांचे नेलकटर शक्यतो वापरू नये. अनेकदा इतरांचे नेलकटर वापरल्याने काही आजार होण्याची शक्यता असते.