घड्याळ नेहमी डाव्याच हातात का घालतात? 99 टक्के लोकांना यामागचं खरं कारण माहीत नसेल

घड्याळ नेहमी डाव्याच हातात का बांधले जाते? यामागे केवळ फॅशन नसून युद्धाचा रंजक इतिहास आणि विज्ञानाचे एक खास कारण दडलेले आहे, जे ९९ टक्के लोकांना माहीत नाही. सविस्तर माहितीसाठी हा लेख नक्की वाचा.

| Updated on: May 11, 2026 | 2:16 PM
1 / 8
सकाळी ऑफिसला निघताना असो किंवा एखाद्या समारंभाला जाताना, छान आवरून झाले की आपला हात आपोआप घड्याळाकडे वळतो. त्यानंतर अगदी क्षणाचाही विलंब न करता आपण ते डाव्या हाताच्या मनगटावर बांधतो.

सकाळी ऑफिसला निघताना असो किंवा एखाद्या समारंभाला जाताना, छान आवरून झाले की आपला हात आपोआप घड्याळाकडे वळतो. त्यानंतर अगदी क्षणाचाही विलंब न करता आपण ते डाव्या हाताच्या मनगटावर बांधतो.

2 / 8

पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की जगभरातील कोट्यवधी लोक घड्याळासाठी डाव्या हातालाच का पसंती देतात? उजव्या हातात घड्याळ घातले तर काय बिघडेल? या साध्या वाटणाऱ्या कृतीमागे चक्क युद्धाचा इतिहास, मानवी स्वभाव आणि विज्ञानाचे एक लॉजिक आहे.

3 / 8

पूर्वीच्या काळी घड्याळ हे पुरुषांच्या कोटच्या खिशात असायचे, ज्याला 'पॉकेट वॉच' म्हटले जाई. स्त्रिया मात्र ते गळ्यात लॉकेटप्रमाणे किंवा मनगटावर दागिन्यासारखे वापरत. मात्र, विसाव्या शतकाच्या सुरुवातीला युद्धाच्या काळात सैनिकांना वेळेचे गणित अचूक ठेवणे गरजेचे होते.

4 / 8

खिशातून घड्याळ काढून वेळ पाहणे युद्धाच्या मैदानात धोक्याचे आणि गैरसोयीचे ठरू लागले. त्यामुळे सैनिकांनी घड्याळ हातावर बांधायला सुरुवात केली. बहुतांश सैनिक उजव्या हाताने शस्त्र चालवत असल्याने, त्यांनी घड्याळ डाव्या हातावर बांधणे पसंत केले जेणेकरून वेळ पाहताना शस्त्र सोडण्याची गरज पडू नये.

5 / 8

जगातील सुमारे ९० टक्के लोक उजव्या हाताने काम करणारे (Right-handed) आहेत. आपण लिहिणे, जड वस्तू उचलणे किंवा तांत्रिक कामे करण्यासाठी उजव्या हाताचा वापर जास्त करतो. जर घड्याळ उजव्या हातात असेल, तर ते कामाच्या ओघात एखाद्या वस्तूवर आदळण्याची, काच फुटण्याची किंवा स्क्रॅच पडण्याची शक्यता जास्त असते. याउलट, डावा हात तुलनेने कमी सक्रिय असतो, त्यामुळे महागड्या घड्याळाचे संरक्षण होते.

6 / 8

एनालॉग घड्याळांमध्ये वेळ बदलण्यासाठी किंवा चावी देण्यासाठी 'क्राऊन' (Crown) नावाचे छोटे बटन असते. हे बटन घड्याळाच्या डायलवर उजव्या बाजूला असते. जेव्हा घड्याळ डाव्या हातात असते, तेव्हा उजव्या हाताच्या अंगठ्याने आणि तर्जनीने वेळ सेट करणे अत्यंत सोपे जाते.

7 / 8

जर घड्याळ उजव्या हातात घातले, तर हे बटन डाव्या बाजूला येईल आणि वेळ लावताना अडचण निर्माण होईल. आजच्या डिजीटल आणि स्मार्टवॉचच्या युगात चावी देण्याची गरज उरलेली नाही.

8 / 8

तरीही, हार्टबीट्स मोजणारे सेन्सर किंवा इतर फीचर्स हे अशा प्रकारे डिझाइन केलेले असतात की ते डाव्या हातावर अधिक अचूकपणे काम करतात. तसेच, मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर काम करताना उजवा हात माऊस किंवा पेनमध्ये व्यस्त असताना डाव्या हातावर एका नजरेत नोटिफिकेशन पाहणे सोपे पडते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us