
पती-पत्नीच्या नात्यातील गोडवा हा एकमेकांवरील प्रेम, विश्वास यातून व्यक्त होत असतो. अनेक महिला मोबाईलच्या संपर्क यादीत पतीचे नाव आहो, अहो अशा नावाने सेव्ह करतात. त्यांच्या आहो विषयीचा आदर, प्रेम यातून व्यक्त होते.

पती सुद्धा त्यांच्या पत्नीचे नाव हटके अंदाजात मोबाईलमध्ये सेव्ह करू शकतो. यामध्ये सरकार हे नाव अगदी युनिक आहे. अनेक जण बायकोचा नंबर सरकार, वादळ या नावाने सेव्ह करतात.

दुसरं नाव म्हणजे Home Minister, Head Minister, काही जण पत्नीला होम मिनिस्टर म्हणून संबोधतात. हे पण नाव हटके आहे.

काही जण अर्धांगिनी या नावाने सुद्धा पत्नीचा नंबर सेव्ह करतात. माझी रखुमाई, पार्वती या नावाने सुद्धा प्रति शब्द वापरतात.


Lifeline, माझं सर्वस्व, दिलाची राणी, डार्लिंग, कारभारीन, अशा नावाने पण काही जण बायकोचा मोबाईल क्रमांक सेव्ह करतात.