पुण्यात वसुलीवरून हाणामारी.. एजंटला प्रकरण भोवणार? आरबीआयचा तो नियम येणार अंगलट?

पुणे शहरात थकीत क्रेडिट कार्ड बिलाच्या वसुलीवरून एजंटची ग्राहकाला भर रस्त्यात मारहाण. एजंटला प्रकरण भोवणार? RBI च्या त्या नियमाखाली होणार कारवाई?

| Updated on: Apr 28, 2026 | 1:29 PM
1 / 5
पुणे शहरात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारी आणि वादाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. अशातच हडपसर परिसरातील अत्यंत वर्दळीच्या 15 नंबर चौकात भरदिवसा घडलेल्या मारहाणीच्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे.

2 / 5
मिळालेल्या माहितीनुसार, एका खासगी बँकेचा रिकव्हरी एजंट थकीत क्रेडिट कार्ड बिलाच्या वसुलीसाठी संबंधित ग्राहकाला भेटण्यासाठी आला होता. दोघांची भेट 15 नंबर चौकात झाली असता सुरुवातीला त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. वसुलीच्या पद्धतीवरून आणि एजंटच्या बोलण्यावरून हा वाद आणखी चिघळत गेला.

3 / 5
काही क्षणांतच हा वाद विकोपाला जात दोघांमध्ये जोरदार हाणामारी सुरू झाली. भररस्त्यात रिकव्हरी एजंटने ग्राहकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली  हा प्रकार पाहून परिसरातील वाहनचालक आणि पादचारी काही काळ स्तब्ध झाले. गर्दीच्या वेळी घडलेल्या या घटनेमुळे वाहतुकीलाही काही प्रमाणात अडथळा निर्माण झाला.

4 / 5
या घटनेमुळे बँकांकडून नेमण्यात येणाऱ्या खासगी वसुली एजंट्सच्या कामकाजाच्या पद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च्या नियमांनुसार, कोणत्याही ग्राहकावर वसुलीसाठी दबाव टाकणे, धमकावणे किंवा सार्वजनिक ठिकाणी अपमानित करणे बेकायदेशीर आहे.

5 / 5
तरीदेखील अनेक वेळा काही एजंट्सकडून दबाव टाकण्याच्या किंवा आक्रमक वर्तनाच्या तक्रारी समोर येत असतात. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी पुढील चौकशी सुरू असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us