
झी मराठी वाहिनीवरील 'शिवा' या मालिकेचं कथानक अत्यंत उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. सीताईच्या मनात आपल्यासाठी जागा निर्माण करण्याचे शिवाचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत.

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सीताई चिडलेली असताना आशू शिवाला सीताईच्या मनाप्रमाणे वागण्याचा सल्ला देतो. शिवा घरातील सर्व काम करते आणि घरच्यांसाठी वेळेत नाश्ता बनवते. पण तरीही सीताई तिला टोमणे मारते.

किर्ती सीताईला तिच्या गैरहजेरीत शिवाने केलेल्या प्रतापाबद्दल सांगते. माणसांना आपलंसं केलं की त्यांच्या गोष्टी पण आपल्याश्या वाटतात असं आशू म्हणताच सीताईला धक्का बसतो. शिवा सीताईचं मन जिंकण्याची जबाबदारी घेते.

सीताई रस्त्याने जात असताना तिथे काही चोर येतात आणि सीताईच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतात. सीताई शिवाला काहीही कर पण माझं सौभाग्य मला परत हवं आहे असं सांगते.

शिवा त्या चोरांचा पाठलाग करते आणि त्यांना पकडून धडा शिकवते. शिवा चोरांना सीताईची माफी मागायला लावते. यात शिवाच्या हाताला दुखापत होते. हे पाहताच सीताई स्वतःच्या साडीचा पदर फाडते आणि तिच्या जखमेवर बांधते.