Marigold Plant : झेंडूच्या रोपाला येतील भरभरून फुले; किचनमधील ही एक वस्तू बनवेल गार्डन हिरवेगार

हिवाळा हा फुलझाडांसाठी पोषक ऋतू मानला जातो. या दिवसांत झेंडूच्या रोपाला भरपूर फुले यावीत, असे वाटत असेल तर कांद्याच्या सालींपासून तयार केलेल्या नैसर्गिक खताचा उपयोग करू शकता. हे खत घरी सहज तयार करता येते.

| Updated on: Nov 26, 2026 | 7:36 PM
1 / 5
दररोज वापरल्या जाणाऱ्या कांद्याच्या स्वच्छ साली एका ठिकाणी जमा करा. त्यामध्ये इतर भाज्यांचे अवशेष किंवा कुजलेल्या साली नसाव्यात. या साली एका सुती कापडात बांधून त्याची पुरचुंडी तयार करा.

दररोज वापरल्या जाणाऱ्या कांद्याच्या स्वच्छ साली एका ठिकाणी जमा करा. त्यामध्ये इतर भाज्यांचे अवशेष किंवा कुजलेल्या साली नसाव्यात. या साली एका सुती कापडात बांधून त्याची पुरचुंडी तयार करा.

2 / 5

एका मोठ्या भांड्यात स्वच्छ पाणी घेऊन त्यामध्ये कांद्याच्या सालींची पुरचुंडी बुडवा. हे भांडे झाकून सावलीच्या ठिकाणी ठेवा. साधारण 3 ते 7 दिवस हे मिश्रण तसेच राहू द्या.

3 / 5

काही दिवसांनी पाण्याचा रंग गडद झालेला दिसेल. त्यानंतर पुरचुंडी बाहेर काढून हलक्या हाताने पिळून घ्या. अशा प्रकारे कांद्याच्या सालींपासून खत तयार होईल.

4 / 5

तयार झालेले पाणी झाडांच्या मुळांशी घालू शकता. मात्र, ते वापरण्यापूर्वी त्यात थोडे साधे पाणी मिसळून घ्या.

5 / 5

कांद्याच्या सालींमध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांसारखी पोषक तत्त्वे असतात. त्यामुळे झाडांच्या वाढीस मदत होऊ शकते. योग्य काळजी घेतल्यास झेंडूच्या रोपाला नवीन कळ्या आणि फुले येण्यास मदत मिळू शकते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us