Gardening Tips : घरातील रोपांची हिवाळ्यात अशी घ्या काळजी; वर्षभर टिकेल हिरवळ! पाने गळताच…

हिवाळा सुरू झाला की घरातील झाडांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. या दिवसांत थंडी आणि कमी तापमानामुळे रोपांची वाढ मंदावते. अनेकदा तुळस, मनी प्लांट, स्नेक प्लांट आणि रबर प्लांट यांसारख्या झाडांची पाने पिवळी पडू लागतात किंवा रोपे सुकू लागतात. मात्र, काही सोप्या गार्डनिंग टिप्स वापरून तुम्ही घरातील रोपे निरोगी आणि हिरवीगार ठेवू शकता. जाणून घेऊया रोपांची काळजी घेण्याचे 5 सोपे उपाय.

| Updated on: Nov 29, 2026 | 5:02 PM
1 / 5
हिवाळ्यात झाडांना वारंवार पाणी देण्याची गरज नसते. कुंडीतील माती वरून कोरडी झाल्यानंतरच रोपांना पाणी द्यावे. जास्त पाण्यामुळे मुळांना नुकसान होऊ शकते, त्यामुळे कुंडीला पाण्याचा निचरा होण्यासाठी छिद्र असणे आवश्यक आहे.

हिवाळ्यात झाडांना वारंवार पाणी देण्याची गरज नसते. कुंडीतील माती वरून कोरडी झाल्यानंतरच रोपांना पाणी द्यावे. जास्त पाण्यामुळे मुळांना नुकसान होऊ शकते, त्यामुळे कुंडीला पाण्याचा निचरा होण्यासाठी छिद्र असणे आवश्यक आहे.

2 / 5

रोपांची पाने पिवळी पडली किंवा सुकली असतील तर ती वेळेवर काढावीत. मनी प्लांटच्या वेलीची अधूनमधून हलकी छाटणी करावी. यामुळे नवीन फांद्या येण्यास मदत होऊ शकते.

3 / 5

रोपांच्या चांगल्या वाढीसाठी सेंद्रिय खताचा वापर करावा. वर्मीकम्पोस्ट किंवा पातळ केलेले जैविक खत रोपांसाठी उपयुक्त ठरू शकते. तसेच धुतलेल्या आणि वाळवलेल्या चहाच्या पत्तीचा मर्यादित वापरही करता येतो

4 / 5

मनी प्लांटची वेल वाढण्यासाठी मॉस स्टिक किंवा इतर आधाराचा वापर करा. त्यामुळे वेलीला वरच्या दिशेने वाढण्यास मदत होते. कुंडीतील माती, पाणी आणि प्रकाश यांचे योग्य संतुलन राखल्यास रोप हिरवेगार राहू शकते.

5 / 5

थंड वारे आणि पाला यांचा झाडांवर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रोपे अतिथंड ठिकाणी ठेवणे टाळावे. त्यांना पुरेसा प्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवल्यास त्यांची वाढ चांगली होण्यास मदत होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us