
गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील गारवा वाढला आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर थंडीचा जोर वाढलेला दिसतोय. काही ठिकाणी तर पारा थेट 15 अंश सेल्सिअसच्याही खाली घसरताना दिसतोय. असे असतानाच आता हवामान विभागाचा चिंता वाढवणारा नवा अंदाज समोर आला आहे.

आता नाशिककरांची चिंता वाढवणारी माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार उत्तरेकडून येणाऱ्या थंडीच्या लाटेमुळे गेल्या 4 डिसेंबरपासून किमान तापमानाचा पारा दहा वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक घसरला आहे.

सध्या थंडी वाढल्यामुळे त्याचा परिणाम कांदा पिकावर होण्याची शक्यता आहे. थंडीमुळे कांदा पिकावर मावा, करपा या रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. तसा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

कांदा पिकावर मावा आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळेच हा प्रादुर्भाव घालवण्यासाठी अतिरिक्त औषध फवारणी करावी, असे सांगण्यात आले आहे. आता अतिरिक्त फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांवर आर्थिक भुर्दंड भरावा लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, तापमानात घट होत असल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन केले जात आहे. तसेच थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी उबदार कपडे परिधान करावेत, असे सांगितले जात आहे.