Mumtaz : महिला त्या हिरोच्या शरीराकडे आकर्षित व्हायच्या, पण आमच्या दोघांमध्ये..अभिनेत्री मुमताज यांनी जाहीरपणे जे होतं ते सांगितलं

Mumtaz : मुमताज यांनी बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवला. अभिनय आणि सौंदर्य ही त्यांची ओळख होती. त्यावेळी त्यांची एका हिरोसोबत खास मैत्री होती. त्याची खूप चर्चा व्हायची. आता इतक्या वर्षांनी मुमताज यांनी त्या बद्दल खुलासा केला आहे.

| Updated on: Apr 24, 2026 | 3:39 PM
1 / 5
बॉलिवूडमध्ये प्रत्येक हिरोइनचा एक काळ असतो. अभिनेत्री मुमताज यांचा सुद्धा एक असाच काळ होता. 70-80 चं दशक मुमताज यांनी गाजवलं. अनेक हिट चित्रपट त्यांनी दिले. त्याकाळचे आघाडीचे हिरो राजेश खन्ना, फिरोज खान यांच्यासोबत त्यांनी काम केलं.

बॉलिवूडमध्ये प्रत्येक हिरोइनचा एक काळ असतो. अभिनेत्री मुमताज यांचा सुद्धा एक असाच काळ होता. 70-80 चं दशक मुमताज यांनी गाजवलं. अनेक हिट चित्रपट त्यांनी दिले. त्याकाळचे आघाडीचे हिरो राजेश खन्ना, फिरोज खान यांच्यासोबत त्यांनी काम केलं.

2 / 5

'अपराध' या सिनेमात त्यांनी पहिला आणि करिअरमधील एकमेव बिकिनी सीन दिला. त्यावेळी आजच्या इतका समाज ओपन मानसिकतेचा नव्हता. त्यामुळे मुमताज यांच्या त्या बिकिनी सीनची त्यावेळी खूप चर्चा झालेली. हा फिरोज खान यांचा सिनेमा होता.

3 / 5

आदमी और इन्सान, मेला, उपासना या चित्रपटात मुमताज यांनी फिरोज खान यांच्यासोबत काम केलं. त्यांच्यामध्ये घट्ट मैत्री होती. अलीकडेच एका मुलाखतीत मुमताज फिरोज खान यांच्याबद्दल बोलल्या. त्यांच्यामध्ये काय संबंध होते, याचा सुद्धा मुमताज यांनी उलगडा केला.

4 / 5

त्याकाळी अशी एकही महिला नव्हती कि, जी शारीरिकदृष्टया फिरोज खान यांच्याकडे आकर्षित होत नव्हती. बऱ्याच महिलांना फिरोज खान यांच्याबद्दल शारीरिक आकर्षण होतं. कारण ते दिसायला खूप हँडसम होते असं मुमताज म्हणाल्या.

5 / 5

फिरोज खानला मी आवडायचे. पण त्यांची गर्लफ्रेंड होती. त्यामुळे आमच्यात कधी शरीरसंबंध प्रस्थापित झाले नाहीत. आमच्या फिल्म इंडस्ट्रीमधील तो एक हँडसम हिरो होता. अजूनही त्यांच्या बरोबरीच कोणी नाही असं मुमताज विकी लालवानीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us