सोनं झालं स्वस्त, चहाच्या किंमतीत मिळतंय 24 कॅरेट गोल्ड, किंमत वाचून बसेल धक्का!

भारतात सोन्याचे दर गगनाला भिडले असताना व्हेनेझुएलामध्ये मात्र १ ग्रॅम सोने एका कप कॉफीच्या किमतीत मिळत आहे. यामागील आर्थिक संकट आणि धक्कादायक कारणांचा हा सविस्तर आढावा

| Updated on: Jan 08, 2026 | 4:12 PM
1 / 8
भारतात सध्या सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. मध्यमवर्गीयांसाठी सोन्याचे दागिने खरेदी करणे हे आता स्वप्नवत राहिले आहे. पण तुम्हाला विश्वास बसणार नाही कीजगात असा एक देश आहे जिथे एका कप कॉफीच्या किंमतीत तुम्ही एक ग्रॅम सोनं खरेदी करू शकता? आज आपण याबद्दलची माहिती घेणार आहोत.

2 / 8
भारतात एका ग्रॅमची किंमत सोन्याची किंमत साधारण ७ ते ८ हजारांपेक्षा जास्त आहे. पण दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला या देशात सोने खरेदीचे हे गणित वेगळे आहे. 
दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला या ठिकाणी २४ कॅरेट सोन्याचे एक ग्रॅम सोने भारतीय चलनानुसार केवळ १८१.६५ रुपये इतके स्वस्त मिळते.

भारतात एका ग्रॅमची किंमत सोन्याची किंमत साधारण ७ ते ८ हजारांपेक्षा जास्त आहे. पण दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला या देशात सोने खरेदीचे हे गणित वेगळे आहे. दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला या ठिकाणी २४ कॅरेट सोन्याचे एक ग्रॅम सोने भारतीय चलनानुसार केवळ १८१.६५ रुपये इतके स्वस्त मिळते.

3 / 8
तर २२ कॅरेट सोन्याची किंमत साधारण ₹१६६ प्रति ग्रॅम आहे. ही किंमत एखाद्या चांगल्या हॉटेलमधील चहा किंवा कॉफीच्या बिलापेक्षाही कमी आहे. पण सोनं इतकं स्वस्त मिळणं हे व्हेनेझुएलाच्या श्रीमंतीचे लक्षण नसून, तिथल्या विस्कळीत झालेल्या अर्थव्यवस्थेचे लक्षण आहे.

4 / 8
व्हेनेझुएलाचे चलन बोलिव्हर (VES) याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कमालीची घसरली आहे. या ठिकाणी महागाई इतकी वाढली आहे की लोकांच्या हातात नोटांची बंडले आहेत पण त्याची किंमत कवडीमोलाची झाली आहे.

5 / 8
समोर आलेल्या अहवालानुसार, २०१३ ते २०१६ या काळात राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या कार्यकाळात सुमारे ११३ मेट्रिक टन सोने गुप्तपणे स्वित्झर्लंडला पाठवण्यात आले होते. देशावरील कर्ज फेडण्यासाठी आणि अर्थव्यवस्था सावरण्यासाठी सरकारने आपल्या सोन्याच्या साठ्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला.

6 / 8
त्यामुळे एकेकाळी सोन्याने समृद्ध असलेल्या या देशाकडे २०२४ पर्यंत केवळ १६१ टन सोने शिल्लक असल्याचे ट्रेडिंग इकॉनॉमिक्सची आकडेवारी सांगते. व्हेनेझुएला हा निसर्गाची देणगी लाभलेला देश आहे. जगातील एकूण कच्च्या तेलाच्या साठ्यापैकी १७ टक्के साठा एकट्या व्हेनेझुएलाकडे आहे.

7 / 8
इतकेच नाही तर तिथे हिरे, बॉक्साईट आणि ८,००० टनांहून अधिक सोन्याचे साठे जमिनीत गाडलेले आहेत. मात्र, चुकीची सरकारी धोरणे, भ्रष्टाचार आणि संसाधनांचे गैरव्यवस्थापन यामुळे हा देश आज आर्थिक संकटात सापडला आहे.

8 / 8
त्यामुळे व्हेनेझुएलातील स्वस्त सोने हे तिथल्या समृद्धीचे नव्हे, तर एका कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेचे आणि सामान्य जनतेच्या संघर्षाचे प्रतीक बनले आहे.