
क्रिकेटचा देव म्हणजेच सचिन तेंडूलकर याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त मॅच खेळल्या आहेत. सजिनने 200 टेस्ट, 463 वनडे, आणि 1 टी -20 मॅच खेळली आहे. त्यात सचिनने 34357 धावा केल्या आहेत.

श्रीलंकेचा जबरदस्त ओपनर बॅट्समन माहेला जयवर्धने ने 652 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ज्यात 149 टेस्ट, 448 वनडे, 55 टी-20 सामने आहेत. त्यात त्याने 25957 धावा केल्या आहेत.

श्रीलंकेचा सर्वात यशस्वी कर्णधार कुमार संगकारा या यादीत तिसऱ्या स्थानावर येतो. त्याने 134 टेस्ट, 404 वनडे आणि 56 टी-20 सामने खेळून 28016 धावा केल्या आहेत.

या यादीत चौथे नाव श्रीलंकेच्याच सनथ जयसूर्या याचं आहे. ऑलराउंडर जयसूर्याने 586 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यात त्याने 440 विकेट घेतल्या आणि 21032 धावा काढल्या.

ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉटिंग या यादीत पाचव्या स्थानावर आहे. त्याने 168 टेस्ट, 375 वनडे आणि 17 टी-20 सामने खेळले आहेत. पॉटिंगच्या नावावर 27483 धावा आहेत.