
मुशफिकर रहीम याने टी-20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक 33 सामने खेळले आहेत. मात्र त्याला एकदाही मॅन ऑफ मॅच पुरस्काराने गौरवलं गेलं नाही.

दुसऱ्या क्रमांकावर टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार मानला जाणाऱ्या महेंद्र सिंह धोनीचा यामध्ये समावेश आहे. धोनीनेही वर्ल्डकपमध्ये 33 सामने खेळले आहेत. मात्र त्याला एकदाही मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळाला नाही.

तिसरा खेळाडू बांगलादेशचाच महमुदल्लाह असून त्याने 30सामने वर्ल्ड कपचे खेळले आहेत. मात्र त्यालाही सामनावीर पुरस्कार मिळवता आला नाही.

चौथा खेळाडू पाकिस्तानचा मोहम्मद हाफिज असून त्यानेही वर्ल्ड कपमधील 30 सामने खेळले आहेत. मात्र त्याला मॅन ऑफ द मॅच होता आलं नाही.

पाचवा खेळाडू दोनवेळा वर्ल्ड कप विजेत्या संघाचा माजी खेळाडू इयान मॉर्गन आहे. मॉर्गन याने 29 सामने खेळले असून एकदाही त्याला सामनावीर म्हणून गौरवलं गेलं नाही.

सहावा खेळाडू वेस्ट इंडिजमधील दिनेश रामदीन असून त्याने २९ सामने खेळले आहेत. मात्र त्यालाही मॅन ऑफ द मॅच होता आलं नाही.

सातवा खेळाडू न्यूझीलंड संघाचा स्टार खेळाडू रॉस टेलर चौथ्या स्थानी आहे. टेलर याने २८ सामने खेळले आहेत. मात्र त्यालाही अशी कामगिरी करता आली नाही.