Yami Gautam : एका सिनेमासाठी कोट्यवधींचं मानधन अन् महागड्या गाड्यांचा ताफा; यामी गौतमच्या कमाईचा आकडा थक्क करणारा
'विकी डोनर', 'बदलापूर', 'उरी : द सर्जिकल स्ट्राइक', 'बाला' आणि 'आर्टिकल 370' यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्री यामी गौतम हिने बॉक्स ऑफिसवर आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. छोट्या पडद्यापासून करियरची सुरुवात करणारी यामी आज आलिशान आयुष्य जगत आहे. आज यामी कुटुंबियांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. सोशल मीडियावर तिच्या संपत्तीच्या चर्चा देखील रंगलेल्या असतात.

आज अभिनेत्री यामी गौतम हिला कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनयासोबतच यामीच्या खासगी आयुष्याची आणि संपत्तीचीही सध्या चर्चा रंगली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यामीची एकूण संपत्ती अंदाजे 99 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं. अभिनेत्री आज अलिशान आणि रॉयल आयुष्य जगत आहे.
यामी गौतमच्या कमाईचा प्रमुख स्रोत म्हणजे सिनेमा आणि जाहिराती आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती एका सिनेमासाठी साधारण 3 ते 8 कोटी रुपये मानधन घेत, असल्याचं सांगण्यात येत आहे. याशिवाय ब्यूटीप्रॉडक्ट्स, दागिने आणि विविध लाइफस्टाइल ब्रँडच्या जाहिरातींमधूनही ती चांगली कमाई करते. मात्र, तिच्या मानधनाचे अधिकृत आकडे सार्वजनिक करण्यात आलेले नाहीत.
यामी आणि पती सिनेमादिग्दर्शक आदित्य धर यांचे मुंबईतील वांद्रे परिसरात आलिशान घर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या घराची किंमत अंदाजे 15 ते 20 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जाते. त्यांच्या घराचं इंटिरिअर साधे, आकर्षक आणि निसर्गाच्या जवळ जाणारे आहे. लाकडी सजावट, हिरवीगार झाडे आणि सुंदर बाल्कनी यामुळे या घराला खास लूक मिळाला आहे.
यामीकडे हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील गोहर परिसरात सुमारे 25 एकरांवर पसरलेली ऐतिहासिक मालमत्ता असल्याची माहिती देखील समोर येत आहे. जवळपास 100 वर्षे जुन्या या घराची किंमत अंदाजे 8 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं. या घरात पारंपरिक हिमाचली वास्तुकलेची झलक पाहायला मिळते.
यामी आणि आदित्य यांच्या कार कलेक्शनमध्ये ऑडी Q7, ऑडी A4 आणि BMW X7 यांसारख्या आलिशान गाड्यांचा समावेश असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. या गाड्यांमधून त्यांच्या लक्झरी लाइफस्टाइलची झलक पाहायला मिळते.