
अभिनेत्री यामी गौतम सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. नुकतचं तिने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोसोबतच तिने तिला असणाऱ्या त्वचेच्या आजाराबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) तिच्या सिंम्पल लूकसाठी प्रसिद्ध आहे. तिच्या याच लूकमुळे सोशल मीडियावर तिची जबरदस्त चाहता वर्ग आहे. अभिनेत्री यामी गौतम सोशल मीडियावर नेहमीच ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. यावेळीसुदधा तिने मनमोहक फोटो शेअर केले आहेत. या फोटोसोबतच तिने तिला असणाऱ्या आजाराबद्दल तिच्या चाहत्यांना माहिती दिली आहे.

अभिनेत्री यामी गौतमने तिच्या फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. फोटो सोबतच तिने तिची त्वचा केराटोसिस-पिलारिस (Keratosis pilaris)या आजाराने त्रस्त आहे. अशी माहिती चाहत्यांना दिली. यामी गौतमला तरूणवयातच हा आजर झाला होता. या आजारमध्ये त्वचेवर बरीक डाग निर्माण होताता. यापुढे यामीने खूप हिम्मत करून सर्वांना तिच्या आजारबद्दल माहीती दिली आहे,असे लिहिले आहे.

हिंदी सिनेसृष्टी गाजवणारी यामी गौतम सध्या 32 वर्षांची आहे. तिचा जन्म 28 नोव्हेंबर 1988 रोजी झाला. यामी गौतमने ‘उरी’ सारख्या सिनेमामध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. याशिवाय तिने तेलुगु आणि तामिळ सिनेमातही दमदार भूमिका साकारल्या आहेत.