
यमुना नदीला पूर आल्यामुळे दिल्ली आणि एनसीआरमधील सखल भागात पाणी भरले आहे. नोएडामधील मंगरोली, याकुतपूर, पुष्ता हे भाग पाण्याखाली गेले आहेत. तसेच मयूर विहार, जैतपूर पुष्ता, श्याम घाट आणि यमुना बाजारमध्येही पाणी शिरलं आहे. फरिदाबाद आणि गाझियाबादमध्येही पाणी शिरले आहे. (फोटो-PTI)

यमुना नदीच्या पाण्याची पातळी वाढत आहेत त्यामुळे. असगरपूर, मंगरोली आणि छपरौली गावांसह, सेक्टर-128 आणि सेक्टर-135 मधील आलिशान फार्ममध्येही पाणी शिरले आहे. (फोटो-PTI)

नोएडा प्रशासनाने सेक्टर-135 मधील सर्व फार्महाऊस रिकामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कारण दिल्ली एनसीआरमध्ये यमुना नदीच्या पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीच्या वर म्हणजे 206.86 मीटरवर पोहोचली आहे.

मयूर विहार उड्डाणपुलाच्या आसपास राहणारे लोक घरे सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. तसेच यमुनेच्या काठावरील झोपडपट्ट्या पाण्याखाली गेल्या आहेत. बऱ्याच लोकांनी पुलावर आसरा घेतला आहे. (फोटो-PTI)

मयूर विहारमधील स्थानिकांनी पुराबाबत बोलताना म्हटले की, 'मंगळवारी रात्री 3 वाजता अचानक पाणी आणखी वाढले. त्यामुळे पाणी घरात शिरले. त्यामुळे काही लोकांना मदतीसाठी उभारण्यात आलेल्या छावण्यांमध्ये ठेवण्यात आले आहे. (फोटो-PTI)

यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने जुन्या दिल्लीतील रेल्वे पुलावरील रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून वाहनांची वाहतूक थांबवली, तसेच बुधवारी सकाळी 6.20 पासून रेल्वे वाहतूक थांबवली आहे. फोटो-PTI)

यमुना नदीचे पाणी आयएसबीटीजवळील निगमबोध घाट आणि डीडीएच्या वासुदेव घाटापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे या भागातील दुकाने बंद करण्यात आली आहेत. लोक त्यांचे सामान सुरक्षित ठिकाणी नेत आहेत. अनेक लोक बोटीच्या साह्याने ये-जा करत आहेत. (फोटो-PTI)