Honey Singh : ती बॉलिवूडची विवाहित अभिनेत्री, एका मुलाची आई, पण ती मिळाली तर हनी सिंह 562 गर्लफ्रेंड्सनाही सोडायला तयार
Honey Singh : यो यो हनी सिंह हे संगीत विश्वातील एक मोठं नाव आहे. हनी सिंह यांची गाणी वाजू लागताच आपोआप पार्टीचा माहौल बनतो. त्यांच्या गाण्यावर थिरकणाऱ्यांची संख्या कमी नाहीय. हनी सिंह आपल्या म्युजिकबद्दल जितके क्लियर आहेत, तितकेच ते नात्यांच्या बाबतीतही स्पष्टपणे बोलतात.

चित्रपटाचं संगीत बनवणं खूप कठीण असतं. मूड, व्यक्तीरेखा आणि कथानकावर ते अवलंबून असतं. मी दुसऱ्या कोणाच्या मर्जीने म्यूजिक बनवू शकत नाही. म्हणून मी कुठल्या चित्रपटाची दोन-तीन गाणी बनवेन.
मी कधीच अभिनय करणार नाही. आपल्या हिंदी फिल्म इंडस्ट्रीत अनेक दिग्गज आहेत. अक्षय कुमार, शाहरुख खान, सलमान खान आणि अमिताभ बच्चन. भारताकडे मायकल जॅक्सन नाहीय, मी भारताला स्वत:चा मायकल जॅक्सन देईन.
चित्रांगदा सिंह बद्दल हनी सिंहला बरचं आकर्षण आहे. त्यांना अभिनेत्री चित्रांगदा भरपूर आवडते. चित्रांगदा बद्दलचा त्यांचा एका जुना इंटरव्यू व्हायरल झाला आहे. त्यात त्यांनी चित्रांगदासाठी गर्लफ्रेंड्सलाही सोडायला तयार आहे, असं म्हटलं होतं.
2013 साली हनी सिंह यांनी फिल्मफेयरला दिलेल्या इंटरव्यूमध्ये चित्रांगदा बद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. ते म्हणालेले की, माझ्या 562 गर्लफ्रेंड्स आहेत, पण मला चित्रांगदा मिळणार असेल तर मी तिच्यासाठी एकादिवसात सर्वांना सोडेन. चित्रांगद या भूमीवरची नाहीय, ती पँडोरा आहे. एका वेगळ्या ग्रहावरुन ती आलीय. ती इतकी सुंदर आहे की, मी तिच्यासाठी एक रॅप सुद्धा लिहिलं आहे.
हनी सिंहला चित्रांगदा इतकी आवडते की, तिच्यासाठी हनी सिंह चित्रांगदाचा मुलगा जोरावरला सुद्धा दत्तक घ्यायला तयार आहे. मला लहान मुलं आवडतात. चित्रांगदा माझी होणार असेल, तर मी तिच्या मुलाची सुद्धा काळजी घेईन. तिचा नवरा गोल्फर ज्योती रंधावाला मी समजावेन, यार ती एक देवी आहे.